रिपाई डेमोक्रॅटिक कडून सेना आमदाराच्या कृतीचा निषेध* डॉ. माकणीकर व कॅप्टन गायकवाड यांच्या वर गुन्हा नोंद

28

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.27सप्टेंबर):-सेना आमदाराच्या निषेधाचे बॅनर्स अंधेरी विधानसभा मतदार संघात* *झळकत असून राष्ट्रीय महासचिव डॉ*माकणीकर यांच्या वर गुन्हा नोंद करविण्यात आला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने एमआयडीसी येथील झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत प्रकल्पात होत असलेली दादागिरी जनतेला दाखवून देण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र बॅनर का लावले? म्हणून पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर व राज्य महासचिव श्रावण गायकवाड या दोघांवर एम माय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उमेश रामभाऊ शेट्टी या बीएमसी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून वि. स्था गु क्र १०८/२०२१ कलम-३.४ प्रिव्हेन्शन ऑफ डिफेन्समेंट ऑफ पब्लिक प्रॉपर्टीज कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याची नोटिस देण्यात आली असून आमदारांचाव मुजोरीपणा स्पस्ट दिसून येत आहे.

शेकडोच्या संख्येत १६६ विधानसभा मतदारसंघात निषेधार्थ बॅनर झळकत असून आमदार रमेश लटके यांनी बोगस पुराव्याच्या आधारे गरिबांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात स्वतःसाठी सदनिका पात्र करवून घेतली असल्याचा अरोप करण्यात आला आहे. मात्र बनर व प्रत्यक्ष पणे रमेश लटके यांच्या नावाचा नामोल्लेख करण्यात आला नाही तरीही लटके यांना बॅनर्स काढायची घाई का सुटली असावी? हा प्रश जनतेतून बोलले जात आहे.

किंबहुना आमदार रमेश लटके यांनी बृहन मुंबई महानगर पालिका अधीकारी व स्थानिक पोलिसांना हाताशी धरुन रविवार सुट्टीच्या दिवशी शेकडो बॅनर्स काढून टाकण्यात असल्याची घटना घडली आहे. हा लोकशाही व रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबला जात असल्याची चर्चा सर्व सामान्यांच्या गोटातुन येत आहे.

सत्तेत असणारे आमदार रमेश लटके असेच खोटे गुन्हे नोंदवून आंदोलन व आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न करतील शिवाय विनयभंग, बलात्कार, चोरी, खंडणी, अपहार, यासारखे गुन्हे भविष्यात नोंदविले जातील माझ्या व सहकारी श्रावण गायकवाड आम्हा दोघांच्या व परिवाराच्या जीविताला धोका असून पोलीस संरक्षणाची मागणी डॉ माकणीकर यांनी आपल्या जवाबात गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्याकडे केली आहे.