महादेवरावजी तेलकर यांची जयंती संपन्न

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.28सप्टेंबर):-भावसार समाजाचे आद्य संस्थापक महादेवरावजी यांची जयंती भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूर, व भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आली.कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार,शहराध्यक्ष अभिलाषा मैंदळकर,प्रीती लाखदिवे,कांता दखणे, मीनाक्षी अलोने, उज्वला दखणे,वंदना सूत्रावे, पुष्पा दखणे व आदी भावसार समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या.समाजाला उधबोधन करतांना अभिलाषा मैंदळकर यांनी तेलकर यांच्या जीवन पटाला उजाळा दिला.आज महादेवराजीं ची 167 वि जयंती साजरी करीत आहे.

त्यांचा जन्म 1874 ला झाला त्या कठीण काळात विखुरलेल्या समाजाला संघटित करण्याचे जे भगीरथ प्रयत्न केले ते अतुलनीय आहे.त्यांच्या या अथक परिश्रमामुळे आज समाज संघटित होऊन सन्मानाने उभा आहे.कुठलाही समाज एकसंघ होत नाही तोपर्यंत त्याला सामाजिक व राजकीय लाभ होत नाही यावर त्यांचा दृढ विश्वास होता,त्यासाठी त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन अर्धांगिणीला घर सांभाळण्याची जवाबदारी सोपविली व समाजासाठी वाहून घेण्याचा संकल्प केला.व प्रवासाला निघाले,त्यांच्या भगीरथ प्रयत्नांच्या वृक्षाला आज गोड फळे फुले बहरलेली आपण सगळे बघतो आहे.

गाव पातळी ते देश पातळीवर संघटना बघतो आहे.समाजातील सर्व बांधवाना नम्र विनंती आहे की गटा तटाचे राजकारण व आपशी मतभेद दूर सारून समाजाच्या भल्याकरिता एकजूट होणे गरजेचे आहे.या अगोदर कोणी काय केले या कडे दुर्लक्ष करून आपल्याला वर्तमान व भविष्यकारिता योजना बनवाव्या लागतील.एकसंघ,एकजूट समाज निर्माण करून महादेवरावजी तेलकर यांच्या स्वप्नाचा समाज उभा करू अशी प्रतिज्ञा समाज बांधवाकडून घेण्यात आली.