नाशिक येथील सराईत गुंड बाबा शेख शेख हत्याप्रकरणातील आरोपी वर्षानंतर सापडला नांदगाव तालुक्यात

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.28सप्टेंबर):- सिन्नर फाटा येथील सराईत गुंड बाबा शेख यांची हत्या करण्यासाठी ारेकर्‍यांना पिस्तुल पुरवणाऱ्या सागर अहिरे ला गुन्हे शाखेच्या युनिट एक्ने वर्षभरानंतर नांदगाव तालुक्यातील साकुरी येथून रविवारी अटक केली 29 वर्षीय अहिरे हा एकलहरे रोड वरील अरिंगळे मळा येथे 19 सप्टेंबर 20 20 रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास डीजीपी नगर येथील साई मंदिरा जवळ या हत्या करण्यात आली होती वर्षांपूर्वी झालेल्या घटनेत सिन्नर फाटा येथे राहणार कुख्यात गुंड बाबा शेख यांच्यावर मुर्गी राजा आणि ठीप्या या सराईत तानी एका साथीदाराच्या मदतीने गावठी कट्याने पाठीत गोळ्या झाडल्या होत्या त्यात बाबा शेख जखमी झाला होता.

खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला पण मृत्यू पूर्वी बाबा शेखने हल्लेखोरांची नावे सांगितली होती त्यानुसार उपनगर पोलिसांनी तपास करून यांना अटक केली होती तसेच गुन्ह्याचा तपास करून पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी संशयितांविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले मात्र बाबा शेख च्या हते साठी मारेकऱ्यांना गावठी कट्टा पुरवणारा सागर अहिरे एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता दरम्यान मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे पोलीस उपनिरीक्षक माणिक गायकर हवलदार श्रीराम सपकाळ नाईक संजय गामणे संदीप पवार सचिन आजबे मिलिंद बागुल यांना अहिरे हा नांदगाव असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून सागर राहिला नांदगाव तालुक्यातील साकुर येथून अटक केली