धाडच्या सरपंच पदी सौ सावित्रीबाई सत्यवान बोर्डे अविरोध

34

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

धाड(दि.29सप्टेंबर):-धाड येथील सरपंच पदी सामाजिक एकता विकास पॅनलच्या सौ सावित्रीबाई सत्यवान बोर्डे यांची अविरोध निवड झाल्याने अखेर सत्याचा विजय होऊन सत्यवानाची सावित्री आता धाड सारख्या मोठ्या ग्रामपंचायतचा कारभार चालवून खोटेनाटे धंदे करणाऱ्या यमावर विजय मिळणार आहे. धाड सरपंच पदासाठीच्या निवडणूकी साठी अर्ज मागविण्यात आले होते . यासाठी सामाजिक एकता विकास पॅनलच्या सौ सावित्रीबाई सत्यवान बोर्डे यांचाच एकमेव अर्ज आला होता . त्यामुळे त्यांची अविरोध निवड झालेली आहे .

सामाजिक एकता विकास पॅनेलच्या विरोधातील पॅनल जवळ अनुसूचित जातीचा उमेदवार नसल्यामुळे त्यांनी खोट्या कागपत्रांच्या आधारावर खोटे जातीचे प्रमाणपत्र मिळवून धाड येथील सरपंच पद मिळविण्यासाठी खटाटोप केला होता . परंतु त्यांचा हा खटाटोप जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या तपासणीत उघड झाल्याने खातून बी यांचे खोटे प्रमाणपत्र रद्द करून खोटे कागपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र घेतले म्हणून त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन दूध का दूध पाणी का पाणी केल्याने पुन्हा धाडच्या सरपंच पदासाठी निवडणूक लावली होती . त्यात सौ सावित्रीबाई सत्यवान बोर्डे यांची अविरोध निवड झाली आहे.