राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा संपन्न

35

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29सप्टेंबर):-मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी गंगाखेड शहरात परिवार संवाद यात्रे निमित्य गंगाखेड विधानसभा मतदार संघाचा आढावा बैठक घेण्यात आली या बैठकिस उपस्थित मान्यवारणी आपले मत मांडले या वेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याणमंत्री ना. मा. धनंजय मुंढे यांनी गंगाखेड मतदार संघातील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस वर प्रेम करते परंतु आपला पक्ष व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मनोमिलन करून कामाला लाग्याची अवशकता आहे जुने झाले.

गेले त्यावर चर्चा न करता राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी म्हणजे एक परिवार म्हणून काम करावे येणाऱ्या निवडणुका मध्ये नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणूकीं मध्ये आपण नकीच विजय होणार आहोत याची मला खात्री आहे मी तुमच्या शेजारी आहे तुम्ही कधी ही बोलवा मी तुमच्या साठी कधी तत्परतेने येईल.तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ना. मा. जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्याकडून पक्ष बांधणी साठी काय करता येईल या बाबत काही अडचणी ऐकून घेतल्या व लगेच त्याअडचणी दूर कश्या करता येतील या वर मार्गदर्शन दिले यावेळी गंगाखेड मतदार संघातील कार्यकर्त्यानी निवेदन देऊन प्रश्न मांडले.

या वेळी मा.आ. डॉ.मधुसूदन केंद्रे व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मा. आ. बाबाजणी दुराणी आणि मा. अध्यक्ष जिल्हा परिषद परभणी मा.राजेश दादा विटेकर यांनी एकत्र येवून घनदाट मित्र मंडळतील कार्यकर्ते, तसेच आजी, माजी, नवीन येणारे सर्व कार्यकर्त्यांना गटा तटा मध्ये विभागणी नकरता सर्वाना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते म्हणूनच संघटनेची मजबूत बांदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ताकत वाढवण्याची निर्धार करण्यात यावा. असे सांगण्या आले.

या वेळी मंचावर उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ना. मा. जयंत पाटील,महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याणमंत्री ना. मा. धनंजय मुंढे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खाजदार मा. फोजीया खान, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेश अध्यक्ष मा. रुपाली चाखणकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यातील युवा, विध्यार्थी, महिला, यांचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट, जिल्हा अध्यक्ष बबजानी दुराणी,राजेश दादा विटेकार, राष्ट्रवादी गंगाखेड विधानसभा चे अध्यक्ष श्रीकांत भोसले, गंगाखेड तालुका अध्यक्ष माधव भोसले, उपाध्यक्ष सय्यद अल्ताफ, पालम तालुका अध्यक्ष वसंतराव सिरसकर, पूर्णा तालुका अध्यक्ष शहाजी देसाई गंगाखेड शहरअध्यक्ष सय्यद जमीर, पालम शहरअध्यक्ष इमदाद खान तसेच पूर्णा शहरअध्यक्ष अखिल अहेमद आणि इतरत्र अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.