बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर,ओं.बी.सी राष्ट्रीय जनगणना करण्यासाठी निदर्शने

38

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.२९सप्टेंबर):-ओबीसीची राष्ट्रीय जनगणना करा या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडी घ्या वतीने राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण व विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने करण्यात आली .यावेळी ओबीसीची राष्ट्रीय जनगणना करणार नाही असे पत्र कोर्टात देणार्या मोदी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढुनी वेळ काढु भुमिका घेत आहे.ओबीसीच राजकीय आरक्षण घालवण्यास केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे असा आरोप यावेळी विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केला.

ओबीसी घ्या सर्वांगीण विकासासाठी जनगणना करणे हाच पर्याय आहे असे मत यावेळी प्रा. किसन चव्हाण यांनी व्यक्त केले. या आंदोलनात जेष्ठ नेते प्रा. विष्णु जाधव जिल्हा पदाधिकारी सचिन मेंघडंबर संतोष जोगदंड बबनराव वडमारे, भगवंत वायबसे अंकुशराव जाधव, सुदेश पोतदार, सुभान भाई, पप्पु गायकवाड, पुरोषोत्तम वीर, निलेश साखरे, अनुरथ वीर, किरण वाघमारे, युनुस शेख, आकाश साबळे, पंकज पंडीत, राजेश विघ्ने, मनोज चौरे, चेतन पवार, संदीप जाधव, गणेश वीर, पुष्पाताई तुरूकमाने, ॲड. अनिता चक्रे, किशोर भोले,सह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.