चळवळीच्या इतिहासकारांनी भय्यासाहेबांचा इतिहास दडपला – प्रा. भारत सिरसाट

33

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

शेगाव(दि.29सप्टेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळीला दिशा देण्याचे काम सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकरांनी केले. परंतु चळवळीच्या इतिहासकारांनी केवळ आंबेडकरद्वेषामुळे त्यांचा इतिहास दडपला असल्याची खंत सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट यांनी व्यक्त केली.
ते शेगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहामध्ये भारतीय बौद्ध महासभा, बुलढाणा जिल्हा आणि सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर स्मृति अभिवादन समिती द्वारा आयोजित ‘सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर स्मृति अभिवादन कार्यक्रमातुन बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव तायडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विशाखा सावंग, जिल्हा महासचिव अॅड. अनिल इखारे, आतिष खटारे, जिल्हा संघटक भाउराव उमाळे, वंचितनामा वृत्तपत्राचे संपादक अमरदीप वानखडे, शेगाव तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा मनोरमा सावदेकर, शहर अध्यक्षा संगिता ससाणे, अनिल वाकोडे, निलेश वानखडे, गौतम इंगळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे प्रमुख प्रविण विरघट यांनी केले. त्यानंतर वृत्तपत्र ‘वंचितनामा’ (जातिअंतक राजकारणाची चळवळ) साप्ताहिकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात भीमराव तायडे म्हणाले की, भय्यासाहेब आंबेडकर केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे वारसदार म्हणुन नाही तर विचाराचे सच्चे पाईक होते. आंबेडकरी चळवळ आपल्या शिरावर घेवून त्यांनी लढा दिला. त्यांचे जीवनकार्य हे आंबेडकरी चळवळीचा ज्वलंत इतिहासा आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.