शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये देण्याची मागणी

32

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30सप्टेंबर):-तालुक्यातील डोंगर भागातील माखणी पिंपळदरी राणीसावरगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने गंगाखेड तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले सप्टेंबर महिन्यात दि.०७.०९.२०२१रोजी डोंगर भागातील माखणी पिंपळदरी राणीसावरगाव महसूल मंडळात प्रचंड प्रमाणात पाऊस पडून पिकांचे नुकसान झाले आसता प्रशासनाने केवळ नदी काठाचे पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे धोरण जाहीर केले होते.

परंतु दि.२४.०९.२०२१पासुन तर डोंगर भागात तुफान आतीवृष्टी होत असुन डोंगर भागातील माखणी पिंपळदरी राणीसावरगाव महसूल मंडळात प्रचंड प्रमाणात चोहिकडे पाणी पाणी झाले असुन सोयाबीन सह सर्व पिके पाण्याखाली गेली असुन नसुन सडुन कोंब फुटले आहेत डोंगर भागात सर्वत्र अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे तरी डोंगर भागातील माखणी पिंपळदरी राणीसावरगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने डोंगर भागातील शेतकऱ्यांचे दि.०४.१०.२०२१रोज सोमवारी गंगाखेड तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे धरणे आंदोलन करुनही आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास सदरील मागणीसाठी डोंगर भागातील शेतकऱ्यांचे कोद्री रोडवर जायकवाडी कमानी पासी भव्य असे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे या. तहसीलदार यांना निवेदनात कळवण्यात आले.

असुन निवेदनावर डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे आश्रोबा दत्तराव सोडगीर पंडितराव निवृत्ती सोडगीर गोविंद नीळकंठ मुंडे बालासाहेब प्रभाकर सोडगीर दादासाहेब खांडेकर आप्पासाहेब रुपनर केशव भेंडेकर दशरथ मोटे शिताराम देवकते बाबुराव नागरगोजे भास्कर सांगळे विवेक मुंडे जवळेकर जगन्नाथ मुंडे नागनाथ गरड नारायण सोडगीर बालासाहेब रंगनाथ सोडगीर योगेश फड बालासाहेब गुट्टे शंकर रुपनर विजयकुमार गरड वाल्मीक घरजाळे राजाराम हमनर साहेबराव पंडित आदी शेतकरी बांधव उपस्थित होते