सन २०१७ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये उमेदवारांच्या अनामत रकमेत मोठ्या प्रमाणात अनियमितता

29

🔹भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसेचे कैलास दरेकर यांची निवेदनाद्वारे मागणी

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.1ऑक्टोबर):-कसन २०१७ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यामध्ये बहुतांशी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेल्या पात्र उमेदवारांच्या अनामत रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी या विषयी कैलास दरेकर यांनी माहिती अधिकार कायदा २००५ नुसार माहिती अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून बीड जिल्ह्यातील सन २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभे असलेल्या पात्र उमेदवारांच्या अनामत रक्कमेबाबत विचारणा केली असता बीड व पाटोदा तहसील कार्यालयानेच माहिती पुरवली परंतु बाकी एका ही तहसील कार्यालयाने माहिती दिली नाही.

राज्य माहिती आयोगाच्या सुनावणी वेळी सुद्धा उपस्थित राहण्याची तसदी घेतली नाही तसेच बीड व पाटोदा तहसील कार्यालयाच्या माहिती मध्ये पात्र उमेदवारांच्या अनामत रक्कम परत केलेल्या दस्तावेज आढळून आले नाहीत किंवा निवडणूक प्रक्रिया चालू असताना एखाद्या खात्यात ही अनामत रक्कम असल्याचे आढळून आले नाही.

व बाकी आष्टी,शिरूर का.,धारुर,गेवराई,अंबाजोगाई,केज,
परळी,वडवणी,माजलगाव या तालुक्यातील तहसील कार्यालयाने राज्य माहिती आयुक्त यांच्या सुनावणी नंतरही माहिती दिलेली नाही वरील सर्व नमुद केलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पात्र उमेदवारांकडून भरुन घेतलेल्या अनामत रक्कम परत केली गेलेली नसल्याचा कैलास दरेकर यांच्या निदर्शनास आल्याने मनसेचे कैलास दरेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.