संत श्री दयानंद महाराज यांच्या अस्थि विसर्जन कार्यक्रम पंचवटी रामकुंड नाशिक येथे संपन्न

25

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.3ऑक्टोबर):- येथील गोदावरी नदीपात्रात वारकरी संघाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी द्वारे संपन्न झाला . दयानंद महाराज यांनी प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधनाचे मोठे काम केले आहे. आदिवासी भागातील त्यांचे सामाजिक योगदान गौरवास्पद होते. त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.

पंचवटीच्या रामकुंडावर झालेल्या अस्ती विसर्जनाच्या कार्यक्रमात सद्गुरु माऊली दयानंद महाराज आश्रमाचे प्रमुख तथा राष्ट्रीय विश्‍वगामी वारकरी संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हभप सहजानंद महाराज, प्रदेश संघटक हभप ब्रम्हानंद महाराज बीडच्या सचितानंद केरोबा महाराज ढापेवाडी संस्थानाच्या प्रमुख तथा राष्ट्रीय विश्‍वगामी वारकरी संघाच्या प्रदेश सचिव हभप सुनिताताई शिंदे, राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, नाशिक शहर अध्यक्ष योगेश घोलप, हभप ब्रम्हमूर्ती जीवाबाबा महाराज, दयानंद महाराज ट्रस्ट अध्यक्ष काशिनाथ भोये, उपाध्यक्ष पोपट गावित, संचालक यशवंत पवार,जगन तिडके, बाजीराव गोरे, सोमेश्वर शिंदे, राजू खांडवी,भद्रकाली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार, डॉ. मनमोहन चौधरी व हभप भिका महाराज आदींसह वारकरी संप्रदायातील पदाधिकारी व दयानंद महाराज भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.