ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानवी हक्क कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग(दि.3ऑक्टोबर):- ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ची कार्यशाळा कणकवली जिल्हा सिधुदुर्ग येथे कणकवली तहसीलदार आर जे पवार ,पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी, राष्ट्रीय सचिव डॉ जावेद शिकलगार, राष्ट्रीय प्रवक्ता संतोष कदम,पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक घनश्याम सांडिम, जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक, मुख्य कार्यालयीन अधिकारी राकेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्तिथीत सम्पन्न झाली.

मानवी हक्क कार्यशाळेचे सुरवात दिपप्रजावलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सुरु झाली.यावेळी स्टारवृत्त विशेषांकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ,तहसीलदार पवार यांनी सांगताना मानवाधिकाराचा उपयोग प्रत्येकांनी केला पाहिजे प्रशासनातील सहकार्य राहील असे सांगितले, त्याचबरोबर ह्यूमन राईट्स कार्यकर्ता तालुक्यातील शासकीय समितीवर नियुक्त करू असा विश्वास दिला, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व संघटनेचे कार्य राष्ट्रीय व राज्यात उत्कृष्टपणे चालू आहे असे म्हणाले.

घनश्याम सांडिम यांनी सर्वांची ओळख करून दिली व कार्यशाळेचे महत्व विषद केले, संतोष कदम यांनी संघटनेचे नियम सांगितले व काम करताना कोणती काळजी घ्यावी हे सांगितले, डॉ जावेद शिकलगार यांनी वाहतुकविषयी माहिती दिली व केलेले कायदे हे आपल्यासाठीच असतात याचा उपयोग जीवनात करावा असे सांगितले, अध्यक्षीय भाषणात एम डी चौधरी यांनी कोणीही कायद्याचे उल्लंघन न करता मानवी हक्कांचे संरक्षण, संवर्धन करा असे आवाहन केले सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष नाईक यांनी जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला व सर्वाना बरोबर घेऊन काम करू असे सांगितले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली,देवगड,सावंतवाडी,वेंगुर्ला,कुडाळ,मालवण,वैभववाडी येथील तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व मानवाधिकार कार्यकर्ते उपस्तिथ होते