✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.4ऑक्टोबर):- तालुक्यात नवजीवन संगोपन केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,
आरोग्य,शेती विषयक उपक्रमाबरोबरच भटके विमुक्त,आदिवासी,ऊस तोड मजूर,वीट भट्टी कामगार,वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिब मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या नवजीवन संगोपन केंद्रातील अनाथ निराधार ऊसतोड मजूर वीटभट्टी कामगार वंचित घटकातील गोरगरीब मुलांना ज्योती क्रांती बँक शाखा आष्टी यांच्याकडून एका आठवड्याच्या किराणा सामानाची मदत करण्यात आली.

यावेळी बँकेचे शाखाधिकारी कैलास सायकड,तसेच बँक विकास अधिकारी पोपट निगुडे साहेब,नवजीवन संगोपन केंद्र आष्टी चे संस्थापक मेजर विकास म्हस्के,संपत सयकड,नाथा शिंदे,विक्रम सावंत,सुभाष सावंत,विजय शेगर,ज्योती क्रांती बँकेचे कर्मचारी व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना बँकेचे मॅनेजर कैलास सायकड साहेब यांनी जेंव्हा कधी नवजीवन संगोपन केंद्रास मदतीची गरज असेल तेंव्हा आम्ही नक्कीच मदत करू असे आश्वासन दिले.आपले कार्य खूप चांगले हे वाढत जावे असे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या शेवटी नवजीवन संगोपन केंद्राच्या संचालिका श्रीमती तेजस्विनी मासाळकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED