प्रहारचे नायगाव तहसील समोर उपोषण व जनआंदोलन

28

🔸तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले

✒️चांदू आंबटवाड(नायगाव ता.प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.6ऑक्टोबर):-आपल्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्यासाठी अपंगांना शासनाकडे अनेक वेळा टाहो फोडावा लागतो ही एक शोकांतिका असली तरी त्यांची थट्टा शासनाने का, व कुठवर करावी हा प्रश्न असून तीन टक्के व पाच टक्के निधी ग्रामपंचायत स्तरावर वाटप करावा व अंत्योदय चे कार्ड त्वरित वाटप करण्यासाठी प्रहारच्या वतीने नायगाव तहसील पुढे 5 आक्टोंबर रोजी प्रहार च्या वतीने उपोषण व आंदोलन करण्यात आले.

अपंगासाठी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत तीन टक्के व पाच टक्के निधी देण्यात यावा, साठवर्ष, निराधार, श्रावणबाळ यांचे थकीत बिले त्वरित देण्यात यावे, नवीन निराधारांसाठी बैठक घेऊन फार्म मंजूर करावे अशा मागण्या साठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने उपोषण व आंदोलन करण्यात आले असून या अपंगाच्या न्यायासाठी युवानेते रवींद्र पाटील चव्हाण यासह मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे, बालाजी नागठाणे, माधव बैलकवाड, नागोराव पाटील भोसले, तानाजी शेळगावकर व लोकस्वराज्य आंदोलनाचे रावसाहेब पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
तहसीलदार गजानन शिंदे यांनी आपल्या स्तरावर लवकरच या आपल्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देऊन लेखी पत्र दिले तर नायब तहसीलदार संजय देवराय यांनी 50 दिव्यांग बांधवांचे निराधार अर्ज मंजूर झाल्याची आनंदाची बातमी जाहीर पणे सांगितले व ,दिव्यांग बांधवांसाठी मी सदैव तत्पर आहे असे सांगितले.

या वेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे व नायब तहसीलदार संजय देवराय,पत्रकार बालाजी नागठाणे,नागोराव भोसले,यांच्या हस्ते थंड पाजवून उपोषण व आंदोलन सोडवण्यात आले.

यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठलराव मंगनाळे, जिल्हाध्यक्ष श्रीराम पा. पवार, चोंडे, मारुती मंगरुळे, गोपीनाथ आंबटवार, साईनाथ बोईनवाड, रामराव भाकरे, चांदू आंबटवाड, शिवाजी वाघमारे, गंगाधर सूर्यवंशी, मौलासाब शेख, मिलिंद कागडे, अनिल शेटे, शांताबाई चिंतले, बालाजी मुगावे, हनुमंत सीताफुले, सिद्धार्थ जमदाडे, माधव कोसंबे, राजू इरेवाड, एकनाथ संत्रे यासह शेकडो दिव्यांग बांधव,निराधार महिला व बांधव यांची मोठ्या प्रमाणात या आंदोलनात उपस्थिती होती.