भावसार महिला फाउंडेशन द्वारा वृक्षारोपण

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7ऑक्टोबर):-घुटकाळा वार्ड विठ्ठल रुख्मिणी मंदीराशेजारी खुल्या जागेवर भावसार समाज महिला फाऊंडेशन चंद्रपूर व युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेऊन कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार, शहराध्यक्ष अभिलाषा मैंदळकर, छाया बरडे, कमल अलोने,प्रिती लाखदिवे,कांता दखणे आदी अनेक समाजबांधव उपस्तीत होते.

समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षाचे महत्व ओळखले पाहिजे वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे याकडे जर का मानव जातीने दुर्लक्ष केले तर निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही.प्रत्येकाने आपल्या वाढदिवसा निमित्य,लग्नाचा वाढदिवस,सेवानिवृत्ती दिवस असो त्या निमित्य प्रत्येकी 10 झाडे लावण्याचा संकल्प घेतला पाहिजे.निसर्ग तुमची परतफेड नक्कीच करेल शहर सुद्धा वृक्ष व वेलीने बहरेल निसर्गाचा मनमुराद आनंद मिळेल,झाडांच्या सावलीचा गारवा मनाला आनंद देऊन जाईल, यानंतर वाढदिवसाला वृक्ष लावायचे असे आव्हान केले.व वृक्ष दान करण्यात आले.