भिमराव रहाटे यांची स्वतंत्र युनियनच्या मुंबई कार्याध्यक्ष पदी निवड

27

✒️नरेंद्र पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9768887209

मुंबई(दि.7ऑक्टोबर):-मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे,एका छोट्या राज्याचा बजेट असतो एवढा बजेट बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिका कामगार हा तिचा लक्षवेधी कामगार, नेहमीच जीवावर उद्धार होऊन काम करतो पण त्यांची पाहिजे त्याप्रमाणात दखल घेतली जात नाही, कारण कामगार हा अनेक राजकीय पक्षाच्या संघटनेत विभागलेला आहे.त्यामुळे कामगारांच्या समस्या कामगार नेते व प्रशासन, प्रशासनाच्या सोबत केबिन मध्येच कागदावर तडजोडी करून कामगार/कर्मचाऱ्यांचे प्रश्न मिटविले जातात आणि कर्मचारी/कामगार तोंड दाबून मुका मार खात बसतात.कारण संघटना व प्रशासनाच्या विरोधात एकाचवेळी कामगार कर्मचारी संघर्ष करू शकत नाही.

अशा वेळी कामगारांनी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापना केलेली युनियन म्हणजे स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन जी क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न आहे,त्यामुळेच कामगारांना कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सर्वांना न्याय मिळवून देत आहे, म्हणूनच अनेक कामगार कर्मचारी राजकीय पक्षाच्या संघटना सोडून स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन मध्ये सहभागी होत आहेत, नुकतेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातील सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेले मा भिमराव ज्ञा.रहाटे यांनी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन मध्ये प्रवेश घेतला त्यामुळेच त्यांचा प्रशासनातील अनुभव पाहता त्यांना मुंबई विभागाचे “कार्याध्यक्ष” म्हणून अधिकृत निवड करून नियुक्ती पत्र गितेश सरिता गंगाराम पवार, अध्यक्ष व रविंद्र सूर्यवंशी सरचिटणीस स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी रणधीर आल्हाट, कार्याध्यक्ष (महाराष्ट्र राज्य कमिटी) निलेश नांदवडेकर, कार्यालयीन सचिव,नरेंद्र पवार राज्य सहसचिव अमित खरात,मुंबई सचिव,देविदास पवार, सचिव,एस.आर. जाधव,मुंबई संघटक आणि सागर तायडे,अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन,महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना नुसार सर्व पदाधिकारी उपस्थित होते,
आयु. भिमराव ज्ञा.रहाटे यांचे स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या सर्व पदाधिकारी व सभासदाच्या वतीने हार्दिक स्वागत व अभिनंदन करण्यात आले, आणि संघटनात्मक पातळीवर वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.त्यावेळी भिमराव रहाटे यांनी क्रांतिकारी आंबेडकरी विचारांची राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन मजबूत करण्यासाठी तन,मन,धनाने प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.