शिंदखेडा येथे लुपिन तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार

41

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

शिंदखेडा(दि.९ऑक्टोबर):-कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील कोरोना योद्धांचा सन्मान तसेच जिल्हाभरात ठिक-ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन लुपिन फाऊंडेशन तर्फे करण्यात आले.लुपिन फाऊंडेशन धुळे, मार्फत फाउंडेशन सप्ताह निमित्त जिल्हाभरात धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर आदी तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी ,आशा वर्कर ,आरोग्य सेविका ,आरोग्य अधिकारी यांना कोरोना महामारी च्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रमाणपत्र ,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा व्यवस्थापक श्री योगेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी ग्रामीण रूग्णालय शिंदखेडा येथे उपनगराध्यक्ष भिला पाटील,आरोग्य अधिकारी डॉ.रुचिरा पवार,डॉ. अपूर्वा साळुंखे,डॉ. विनय पवार,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण माळी, पि. यु.व्यवस्थापक चेतन बोरसे ,तुकाराम मासुळे,कृषी मित्र राहुल माळी,वंदना मोरे,वृषाली माळी विवेकानंद सावंत आदी उपस्थित होते. तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक तुकाराम मासुळे तर आभार प्रदर्शन चेतन बोरसे यांनी केले. यशस्वीतेसाठी राहुल माळी, विवेकानंद सावंत आदींनी परिश्रम घेतले.