ञिरश्मी बुद्ध लेणीच्या खाजगीकरणाला समाजाने विरोध करावा

🔹अन्यथा बौद्धांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करु नये….

🔸सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांचे आवाहन

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.9ऑक्टोबर):- शहरातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे आणि भारतीय बौध्दांची अस्मिता जागृत ठेवणारे धार्मिक स्थळ म्हणजे *” त्रिरश्मी बुध्दलेणी “* ह्या बुध्दलेणी लेणीच्या पायथ्याला “बुध्दस्मारक” महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आले. त्यालगतच काही एकर जागेवर *चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके स्मारक* देखील नाशिक जिल्ह्यातील बौध्द जनतेचा प्रखर विरोध असतानाही नाशिक महानगरपालिका यांच्या वतीने उभारण्यात आले. *सुदैवाने ते दादासाहेब फाळके स्मारक कालांतराने बंद पडले* त्याचे कारण की बौध्द धम्म हा जगातील सर्वात मोठा शांततेचा प्रतिक म्हणून ओळखला जाणारा धम्म आहे.

नाशिकच्या महानगरपालिकेने नाशिक शहरातील शांतता भंग करण्यासाठी च बौध्द धम्माच्या अस्मितेला सुरुंग लावण्यासाठी *”त्रिरश्मी बुध्दलेणी”* ह्या लेणीच्या पायथ्याला दादासाहेब *फाळके स्मारक उभारण्याचा डाव आखला* पंरतु तो डाव काही वर्षापासून फसलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.
म्हणून फाळके स्मारकाची झालेली पडझड व महानगरपालिकेचे झालेले दुर्लक्ष यामध्ये भारतीय बौद्धांची अस्मिता व *धार्मिक स्थळ बौध्द स्मारक”* या स्मारकाकडे देखील मुजोर महानगरपालिकेच्या कर्मचारी /अधिकारी / नगरसेवक /महापौर / विभागीय अधिकारी /महापालिका आयुक्तांनी जाणुन बुजून दुर्लक्ष केले आहे. *आज तेच बौध्द स्मारक धुळ खात पडलेल्या अवस्थेत* आहे. नाशिक महानगरपालिकेने बौध्द स्मारकाची आजपर्यंत…ना रंगरंगोटी केली आहे…ना..तेथील परिसराची स्वच्छता केली आहे… ना..रोषणाई केली आहे..सर्व शुकशुकाट व रात्री च्या वेळी अंधकारमय वातावरण निर्माण झाले आहे.. त्यातल्या त्यात नव्यानेच आता मुंबईतील एका खाजगी संस्थेला BOT अंतर्गत व्यवस्थापन करण्यासाठी ताबा देण्याचा प्रयत्न* नाशिक महानगरपालिका मोठया प्रमाणावर करीत आहे…

महानगरपालिकेच्या ह्या BOT व्यवस्थापनेला कदाचित *नाशिक मधील नगरसेवक / महापौर / आमदार / खासदार* अशा लोकप्रतिनिधी यांची मुकसंमती तर नसावी ना.असा गंभीर प्रश्न आजमितीस बौध्द जनतेला पडलेला आहे. कुणीही याविषयी बोलायला तयार नाही कुणीही *बौध्दांच्या भावनेचा आदर* करायला तयार नाही महानगरपालिकेच्या *मनमानी कारभाराकडे लक्ष* द्यायला तयार नाही निवडून येण्यासाठी *बौध्द जनतेचे मतदान चालते* मात्र बौध्द जनतेचे अस्मिता असलेल्या *धार्मिक स्थळाचे खाजगीकरण होताना उघडया डोळयाने बघून सुध्दा राजकीय पक्ष व नगरसेवक /महापौर /आमदार / खासदार मंडळी डोळझाक पणा करीत असेल* तर याला काय म्हणायचे…??

बौध्दांच्या धार्मिक स्थळाकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच पर्यायाने बौद्ध समाजाच्या भावनेचा अनादर करणे… असाच सरळसरळ अर्थ निघतो आहे…. आणि म्हणूनच आगामी काळात *नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत* बौध्दांनी बौध्द समाजाचा अनादर करणारे राजकीय पक्षाला आपले अनमोल मतदान करु नये.वामनदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली *त्रिरश्मी बुध्दलेणी तथा बौध्द स्मारक बचाव समिती* स्थापन करण्यात आली आहे… या समिती च्या आंदोलनात सर्व *बौध्द नवतरुण युवक-युवती – महिला – पुरुष* यांनी आज जागृतपणे सहभागी व्हावे…. *आणि*… आगामी महानगरपालिका निवडणुकीत बौध्द स्मारकाकडे दुर्लक्ष करून मुंबई च्या खाजगी संस्थेला व्यवस्थापन करण्यासाठी मुकसंमती देणारे राजकीय पक्ष यांना आपण आपले अनमोल मत देवु नये… असे “जाहीर आवाहन” *महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती* ह्या राज्यव्यापी कलावंत संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे…. असे पत्रक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED