आमदार रमेश लटके यांच्या वर अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा.:- डॉ. राजन माकणीकर

26

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.10ऑक्टोबर):- अंधेरी पूर्व शिवसेनेचे जातिवादी आमदार रामेश लटके यांच्या वर अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांना दिली आहे.*

आमदार रमेश लटके यांचा जातीवादी चेहरा पुढे आला असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या नावाचा उल्लेख असलेले छत्रपती शिवराय व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले भित्तीपत्रके भिंतीला चिकटवले होते ते काढून जाळण्यात आले आहे.

त्यामुळे अट्रोसिटी कायद्याचे उल्लंघन झालेले असून याची चौकशी होणे फार गरजेचे आहे, आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचा आवाज असा दाबला जाऊ नये, आमदार रमेश लटके यांनी सुपारी देऊन हे कृत्य केले असल्याचा दावा बौद्ध RTI ऍक्टिव्हिस्ट डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.

भित्तीपत्रके ज्यावर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची तसविर होती त्यावर आमदार साहेब जवाब दो? अस विचारलं होत, मात्र लटके यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ना देता जातीय सूड भावनेतून हेतुपुरस्करपणे ते जाळून टाकले आहे.

यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, तूर्तास लटके यांना ताब्यात घ्यावे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा व त्यांची निपक्ष चौकशी करावी असे मत विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे विचारला आहे.

माझे सहकारी, परिवार व माझ्या जीविताला धोका असून खोटे गुन्हे नोंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, शिवाय अज्ञात गुंड प्रवृत्तीचे काही लोक माझ्या आजूबाजूला संशयित रित्या दिसून येत आहेत त्यामुळे मला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणीही डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.