वीज पडल्याने भयभित शेतकऱ्यांच्या व्यथा

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधि)

गंगाखेड(दि.10ऑक्टोबर):-आखाड्यावरील झाडावर वीज पडल्याने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सखाराम बोबडे पडेगावकर यांनी रविवारी भाबरवाडीत बांधावर जाऊन ऐकून घेतल्या.भाबरवाडी येथिल शेतकरी मुंजाजी कुबदे व लक्ष्मण कुबदे यांच्या आखाडा जवळ बाबळी चे जुने मोठे झाड आहे. या झाडावर दहा दिवसांपूर्वी वीज पडली .या झाडावरून एम एस ई बी च्या विजेचे वायर आखाड्यावर आल्याने या वायर द्वारे आकाशातून पडलेल्या विजेचा प्रवाह दोन्ही आखाड्यात घुसला .आखाड्यावरील विजेची उपकरणे जळून खाक झाली. घरात सर्व जाळच दिसून येत होता.

घरातील एक महिलाही या घटनेत जखमी झाली. पावसामुळे बंद असलेले रस्ते व सरकारी योजना बद्दलची शेतकऱ्यांच्या मनातील उदासीनता यामुळे या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात येऊन तक्रार दाखल केली नव्हती. ही माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे यांना कळताच त्यांनी आपले सहकारी रोहिदास निरस पाटील यांच्यासोबत जाऊन बांधावर जात प्रत्यक्ष भेट घेतली व त्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतला .त्याच बरोबर जागेवरूनच तहसीलदार गोविंद येल्मे यांना सदर घटनेची माहिती कळवली. तहसीलदार येलमे यांनी तलाठी स पाठवून पंचनामा केला जाईल अशी माहिती दिली.