छ्त्रपती शाहू महाराजांचे खरे वैचारिक वारसदार म्हणजे कोल्हापूरचे पत्रकार : माजी आमदार राजीव आवळे यांचे प्रतिपादन

30

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.11ऑक्टोबर):-उपेक्षितांच्या, वंचितांच्या, शोषण झालेल्या समाजघटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि त्या घटकांना न्याय मिळवून देणारे म्हणून कोल्हापूरचे पत्रकार ओळखले जातात, मात्र फक्त तेवढ्यावर न थांबता कोल्हापूर चे पत्रकार हे लोकराजे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे वैचारिक वारस आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार राजीव आवळे यांनी केले. निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, सन्मान महिला फाऊंडेशन आणि डी. जी. राजहंस मेमोरियल फाऊंडेशन यांचे वतीने कोल्हापुरातील माध्यम कर्मी ना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आले, त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी ते बोलत होते. कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची विशेष उपस्थिती होती.

कोल्हापुरातील पत्रकार मंडळी ही केवळ व्यावसायिकता म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच कोल्हापूरचा लौकीक वाढवणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी उभे राहतात, ही उज्ज्वल परंपरा आहे. असेही ते पुढे म्हणाले.

ह्यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजीव आवळे यांच्या हस्ते पुढील माध्यमकर्मीचा गौरव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन करण्यात आला. यामध्ये मा. मोहन मिस्त्री, मा. शिवाजी यादव, मा. संजीव खाडे, मा. प्रवीण मस्के, मा. अभिजित जाधव, मा. वैभव गोंधळी, मा. आदित्य वेल्हाळ, मा. ताज मुलाणी, मा. एकनाथ पाटील, मा. सतेज औंधकर, मा. ज्ञानेश्वर साळोखे, मा. सुभाष गायकवाड, मा. राहुल जगताप, मा. जितेंद्र शिंदे, मा. प्रकाश कांबळे आदी माध्यम कर्मी सहभाग होता. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ, कोल्हापुरी फेटा आणि पाच हजार रुपयांची पुस्तके असे होते. धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, सन्मान महिला फौंडेशन, डी. जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रा. किसनराव कुराडे यांनीही संबोधित केले.

अनिल म्हमाने यांनी पुरस्काराची भूमिका स्पष्ट केली, प्रा. करुणा मिणचेकर यांनी स्वागत तर आभार डॉ. कपिल राजहंस मानले.
यावेळी अब्राहमबापू आवळे, प्रा. किसनराव कुराडे, चंद्रकांत सावंत, मंदार पाटील, दादासाहेब तांदळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.