चारित्र्याचा संशयतून पत्नीची निर्घृण हत्या करणारा पतीस जन्मठेपेची शिक्षा

29

✒️नासिक,जिल्हा प्रतिनिधी(विजय केदारे)

नाशिक(दि.12ऑक्टोबर):- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुणपणे हत्या करणारास जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक एक न्यायमूर्ती व्ही एस कुलकर्णी याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आप्पासाहेब निवृत्ती गायके वय 55 राहणार अर्पणा कॉलनी शिवराम नगर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेत ज्योती वय 50 या विवाहित ची हत्या करण्यात आली होती गायके दाम्पत्यात चारित्र्याच्या संशयावरून नेहमी वाद होत होते 10 जानेवारी 20 18 रोजी ज्योती गायकी या आपल्या घरात किचन मध्ये काम करत असताना वाद झाले यावेळी आरोपीने किचन मध्ये पडलेल्या लोखंडे भोसरी आपल्या पत्नीच्या डोक्यात घालून निर्घुन हत्या केली होती.

यावेळी मुलगा हा अजिंक्य आणि त्याच्या बहिणी ने आई-वडिलांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही लोखंडी मुसळी मे मारहाण करीत जखमी केले होते या प्रकरणी अजिंक्य गायके यांच्या तक्रारीवरून वडील अण्णासाहेब गायके यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात खून आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात क्रमांक एक चे न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्या कोर्टात चालला सरकार तर्फे एडवोकेट सुलभा सांगळे यांनी काम पाहिले न्यायालयाने फिर्यादी पंच आणि साक्षीदार यांनी दिल्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपीस खुनाच्या आरोपात जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास सहा वर्ष सश्रम कारावास असेही आपल्या निकालात नमूद केले