झुंज दुर्घटनेतील ११ कुटुंबातील व्यक्तींच्या परिवाराला धनादेश वाटप !

27

🔹आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते प्रत्येकी २ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण ! !

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.14ऑक्टोबर):-श्री क्षेत्र झुंज ता.वरुड येथील वर्धा नदित नाव उलटल्यामुळे पाण्यात बुडून मृत पावलेल्या कुटूंबातील व्यक्तींचे नातेवाईकांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मदत पुनर्वसन राज्यमंत्री प्रजक्त तनपुरे, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, प्रधान सचिव आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन असीम गुप्ता, यांच्याकडे केली होती.

झुंज दुर्घटनेतील कुटूंबाना दुखातुन सावरण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री सहायता निधी मधून या दुर्घटनेमध्ये मृत पावलेले नारायण सोनाजी मटरे, वंशीका प्रदीप शिवणकर, किरण विजय खंडाळे, आदिती सुखदेव खंडाळे, मोहिनी सुखदेव खंडाळे, पियुष तुळशिदास मटरे, पुनम प्रदिप शिवनकर, आश्वीनी अरुन खंडाळे, वृषाली अतुल वाघमारे, अतुल गणेशराव वाघमारे, कु.निशा नारायण मटरे, या ११ व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लक्ष रुपये प्रमाणे एकून २२ लक्ष रुपये मदत तात्काळ मंजुर करून दिल्यामुळे झुंज येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवारातील कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपयांचे आर्थिक सहाय्य अनुदान धनादेश आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते वितरित करण्यात आले .

यावेळी आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, तहसीलदार मालठाणे, राजेंद्र कुकडे, संकेत यावलकर राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष,निखिल बनसोड, गणेश चौधरी, सरपंच सागर हरले, सचिन सावरकर, दादाराव कुकडे, रोषण माटे, यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.

श्री क्षेत्र झुंज येथे नाव पलटी झाल्यामुळे पाण्यात बुडून अकरा व्यक्तीचा दुर्देवी मृत्यु झाला होता, त्यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य मिळणेबाबत शासनाकडे यशस्वी पाठपुरावा करण्यात आला, त्यामुळे झुंज मधील मृत व्यक्तीच्या परिवाराला प्रत्येकी दोन लक्ष रुपयांची सहाय्य निधीची तरतुद करुन देण्यात आली आहे. त्यांच्या परिवाराला २ लक्ष रुपयांचा धनादेश (चेक) तहसील कार्यालय वरुड येथे वितरित करण्यात आला. —— देवेंद्र भुयार आमदार मोर्शी विधानसभा .