धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा अशोका विजयादशमी; बौद्ध बांधवांसाठी एक नवी पहाट

31

सिद्धार्थ गौतम हा शाम्यकुलीय राजा शुधोधन यांचा सुपुत्र संघासोबत झालेल्या वादविवादात त्यांना गृहत्याग करावा लागला .सिद्धार्थ हा आई वडील पत्नी यशोधरा,मुकगा राहुल आणि अमाप संपत्तीचा त्याग करून जगलांत गेला आई वडिलांचा आक्रोश ही त्यांना रोखू शकला नाही.
सिद्धार्थ गौतम रानावनात हिंस्र पशूंच्या घनदाट जनगलांत राहू लागले.सिद्धार्थ हा लहानपणापासूनच शांत स्वभावाचा त्याचा कल शांती,प्रेम,अहिंसा याकडे झुकलेला असे त्यांनी मनाशी ठरवले की जगात दुःख आहे आपण दुःखाचे कारण शोधले पाहिजे आपण सत्याचा शोध घेतला पाहिजे त्यासाठी ते एकांतात राहू लागले दिवस रात्र उपाशी राहून ध्यानसाधना करू लागले इतर ऋषी साधू ज्याप्रमाणे शरीराला क्लेश देतात तसे क्लेश शरीराला सिध्दार्थही देऊ लागला पण काही केल्या त्यांना ज्ञानप्राप्ती होत नव्हती.

सत्याचा शोध लागत नव्हता दाढी वाढलेली,केस वाढविले वेगवेगळ्या मंत्राचा जप केला पण काही केल्या सत्याचा शोध लागत नव्हता.आणि जनकल्याणाचा मार्ग सापडत नव्हता.उर्वेला नगरीच्या सेनानी व्यक्तीची सुजाता ही मुलगी खूप दिवसांनी तिला एक सुंदर मुलगा झालेला होता त्या आनंद प्रित्यर्थ तिने सोन्याच्या ताटात गाईच्या दुधात बनवलेली गव्हाचीच खीर बनवून दान करण्याचे ठरविले तेव्हा तिला कोणीतरी सांगितले की जवळच जनगलांत कोणीतरी महान ऋषी तपश्चर्या करीत बसलेला आहे तो रूपाने देखणा राजबिंडा दिसत आहे तेव्हा सुजाता खिरीने भरलेले ताट घेऊन सिद्धार्थ ज्या वृक्षाखाली बसला होता तिकडे जाऊ लागली सिध्दार्थला वृक्षाखाली बसलेला पाहून तिला वाटले जणू काही वृक्षदेवच शरीर धारण करून तिचा प्रसाद घेण्यासाठी बसला आहे.

आणलेली खीर खाऊ घातली तेव्हा सिध्दार्थला काही लोक म्हणू लागले तुम्ही तपस्वी साधू आहात स्त्रीच्या हातची खीर आपण खाऊ नये त्यावेळी सिध्दार्थने त्यांचं ऐकले नाही त्याने सांगितले एवढ्या भक्तिभावाने खीर घेऊन आलेली स्त्री ही एक माता असू शकते ती एक भगिनी असू शकते सुजाता खीर खाऊ घालताना सिध्दार्थला म्हणाली माझी इच्छा पूर्ण झाली आहे मला एक मुलगा हवा होता सुंदर असा मुलगा मला मिळाला आहे. माझी इच्छा जशी पूर्ण झाली तशी तुमचीही इच्छा पूर्ण होवो.त्या माउलीने दिलेली खीर सिद्धार्थाने मोठ्या भक्तिभावाने खाल्ली आणि ताट शेजारून वाहत जाणाऱ्या नदीत फेकून दिले आणि म्हणाले हे ताट जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले तर मला ज्ञान प्राप्ती होणार नाही आणि योगायोग पहा ते ताट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते आणि त्यांना खूप आनंद झाला. इथे कुठलाही चमत्कार झाला नव्हता तर सिध्दार्थने फेकलेले ते ताट नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललेल्या शेषणागाच्या मस्तकावर ते पडले होते त्यामुळे त्या शेषणागासोबत ते तातही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत होते.

आणि काय आश्चर्य त्याच रात्री ध्यानस्थला बसले असता त्यांना ज्ञान प्राप्ती झाल्याचा भास झाला ती रात्र होती वैशाखी पौर्णिमेची आणि ते ज्या वृक्षाखाली बसले होते तो वृक्ष होता पिंपळाचा,पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांना ज्ञानाचा बोध झाला म्हणून त्या वृक्षास “बोधवृक्ष” म्हणतात.आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धाने स्वतालाच विचारले की,”सर्व प्रथम मी हा उपदेश कोणाला देऊ?” बुद्धाच्या मते तो बुद्धिमान शहाणा व बराच शुधाचरणी होता त्यालाच मी धमोपदेश दिला तर?परंतु आलासकालांम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले.नंतर त्यांनी उद्यक राम पुताला आपला धमोपदेश देण्याचा विचार केला परंतु तो ही मृत्यू पावला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या पाच सोबतचा विचार केला निरंजन नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले होते तेव्हा ते स्वताशी म्हणाले,”त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले त्यांनी माझी सेवा केली त्यांनी माझी काळजी घेतली मग मी त्यांनाच माझा धम्माचा उपदेश दिला तर काय हरकत आहे?”

त्यांनी त्याचा ठावठीकानाची चॉकशी केली तेव्हा समजले की ते काशी जवळील मृगदायवणात म्हणजेच आत्ताचे सारनाथ येथे आहेत तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले त्या पाच जणांना जेव्हा बुद्ध असल्याचे पहिले तेव्हा त्यांचे स्वागत करावयाचे नाही असे ठरविले त्यांच्या पैकी एक जण म्हणाला,”मित्रानो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळाला होता त्याने पाप केले आहे म्हनून आपण त्याचे स्वागत करता कामा नये त्याला माण देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षा पात्र किंवा चिवर आपल्या हाती घेता कामा नये आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेऊन देऊ त्याची इच्छा असल्यास तो येथे बसेल.” सर्वानी हे मान्य केले परंतु बुद्ध त्याच्या जवळ आला तेव्हा ते पाच परिवराजक आपल्या निश्चया नुसार वागू शकले नाहीत बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकणी त्यांव्हे पात्र घेतले एकणी चिवर सांभाळले एकाने त्याच्या सातजी आसन तयार केले आणि एकाने त्यांव्हे पाय धुण्यासाठी आणले खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते.अशा ओरकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची पूजा करू लागले.

बुद्ध परिवराजकाना म्हणाला माझ्या या प्रशनाचे उत्तर द्या जो पर्यत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला एक ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते तोपर्यत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत का?ते उत्तरले,”आपण म्हणता ते बरोबर आहे”हे परिवराजक,ही गोष्ट समजून घ्या की,ही दिन आत्यांतीक टोके अशी आहेत की ,माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या कामतृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषया सक्तीत सतत दुबत राहणे तृप्ती मिळण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रानटी पणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुखकारक अयोग्य आणि हानिकारक आहे.”ही अत्यन्त दोन्ही टोके ज्यामुले टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे ध्यानात ठेवा मी त्याच मध्य मार्गाची शिकवण देतो आहे”.

सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईशवर आणि आत्मा त्याच्याशी काही कर्तव्य नाही त्याचा मरणोत्तर जीवनाशी काही संबंध नाही तसेच त्या धम्माचा कर्मकांड याशी काही संबंध नाही.दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धांच्या धमाचा पाया होय जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करत नाही तो धर्मच नव्हे.भगवान बुद्धाने सांगितले की या धममानुसार जर प्रत्येकाने पवित्राचा मार्ग अनुसरला सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा नायनाट होईल आणि अशा धम्माचा आपण अविष्कार केला आहे.बौद्ध धम्माच्या इतिहासानुसा र या देशामध्ये तीन धम्मचक्र प्रवर्तन घडले परिवर्तनाच्या या तीन घटना मानवी मनाच्या सम्यक म्हणण्याचे कारण असे की ही तिन्ही प्रवर्तने त्या त्या काळात कायम स्वरूपी रुजली गेली आहेत पहिले धम्मचक्र प्रवर्तन हे भगवान बुद्ध यांनी इ.स.पूर्वी 528 च्या आष्टी पौर्णिमेला सारनाथ येथे घडविले त्यांच्या प्रथम उपदेशाने भारावून पाच ब्राम्हण परिवराजकांनी आपला पारंपारिक धर्म सोडून बौद्ध धम्मचा स्वीकार केला म्हणजेच त्यांचे परिवर्तन होऊन ते नवीन जीवन मार्गाला लागले.

त्यानुसार बौद्ध क्लेनुसार सम्राट अशोकाच्या काळापर्यत धम्मचक्र प्रवर्तन दिन हा “आष्टी पौर्णिमेला” या तिथीनुसार साजरा केला जातो कारण त्या काळात पाश्चिमात्य कालगणना अस्तित्वात नव्हती परंतु जी कालगणना अस्तित्वात होती तयानुसार बुद्धां नि अष्ट पौर्णिमेला सुरू केलेला धम्मचक्र प्रवर्तन दिन सम्राट अशोकाच्या काळात विजयादशमी या तिथीत कसा परावर्तित झाला याचा अभ्यास करणें क्रमप्राप्त ठरते.सम्राट अशोकाने कलिंगवर विजय प्राप्त केल्यानंतर आठ वर्षे तो भिक्खू संघाच्या सहवासात राहिला आणि विजयादशमीलाच त्याने उपगुप्त या भिखु कडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या आठ वर्षात त्याने प्रजा धर्म,राजधर्म आणि नीती धर्म या धर्म नितीप्रमाणे आचरण करून प्रजेला अभय दिले अनेक प्रकारच्या सुख सोयी निर्माण करून प्रजेला सुखी केले.पंचशीलावर,”दसहरा” ही आचारसंहिता लागू करून प्रजेला बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्याच्या कर्तृत्वाने तत्कालीन प्रजा इतकी भारावून गेले की त्यांनी भगवान बुद्धांचा अष्ट पौर्णिमा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन बाजूला ठेवून सम्राट अशोकाने ज्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ती दिवस म्हणजे “विजयादशमी” हा दिन “धम्मचक्र प्रवर्तन” म्हणून पाळायला प्रारंभ केले.

10 आचारसंहितेनुसार सम्राट अशोकाच्या काळापासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या (1956) काळापर्यत”धम्मचक्र प्रवर्तन दिन”हा ‘अशोका विजयादशमी’म्हणून “दसहरा” या तिथीला साजरा केला जात असे.तिसरे”धम्मचक्र प्रवर्तन दिन”हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमीच्या (दसहरा) दिवशी घडविले खरे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यापूर्वी धम्म दीक्षेचा कार्यक्रम ठेवता आला असता परंतु 1956 साली येणारी बौद्ध धम्मातील “अशोका विजयादशमी” आणि 14 ऑक्टोबर हा एकच दिवशी आल्याने या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी तिसरे महान “धम्मचक्र प्रवर्तन” घडवून आणले या दिवशी लाखो दलित अनुयायी नी आपला जुना धर्म सोडून बौद्ध धम्मचा स्वीकार केला म्हणून 1956 पासून 14 ऑक्टोबर या दिनाशी आपले नाते जुळले.आजचे धर्मातरीत बौद्ध परिपूर्ण आदर्श बौद्ध धर्मीय बनले आहेत का?याचे उत्तर खेदाने “नाही” असेच येते आजच्या बौद्धणी सार्वजनिक, सामाजिक स्तरावर बौद्ध धर्म स्वीकारला पण व्यक्तित्व पावले मात्र अजूनही पारंपारिक धर्मातच अडकलेली दिसून येतात. याचे कारण ज्या गांभीर्याने त्या धम्माचा अभ्यास करून ती प्रत्यक्ष आचरणात आणावयास पाहिजे होते तसे घडले नाही परिणामी 1956 नंतर बौद्ध समाज दोन्ही धर्मावर श्रद्धा ठेवून जगत राहिला असे असले तरीही धम्म क्रतीमुळे धर्मातरीत बौद्धांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आहे धर्मातरीत बौद्ध समाजाचे 65 वर्षातील प्रगती कोणाच्याही नजरेत भरण्या इतकी आहे.

धर्म ही कपडे बद्दलण्या इतकी सोपी गोष्ट नाही तर ही मानसिकतेत बदल करण्याची प्रक्रिया आहे म्हणून धर्मानतराकडे चळवळ म्हणून पाहिले पाहिजे धर्मातरामुळे झालेले परिवर्तन एकांगी स्वरूपाचे नाही तर ते सामाजिक धार्मिक,मानसिक,शैक्षणिक,आर्थिक इ.सर्वच क्षेत्रात आढळून येते एवढेच नव्हेतर धर्मातरीत काही बौद्ध ही विज्ञाननिष्ठ,विवेकनिष्ठतेने आणि तार्किकपणे विचार करतात हे मानसिक परिवर्तन विलक्षण स्वरूपाचे आहे.डॉ.बाबासाहेबानी केलेल्या या धर्मकरांतीमुळे नागपूर शहर ‘बौद्ध करांती स्थळ’ म्हणून झळकले ‘दीक्षाभूमी’या नावाने नागपूरला नवीन ओळख प्राप्त झाली दिक्षाभूमीत उभारलेल्या स्तुपामुळे एक नवीन ऊर्जा मिळते स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा मिळते मनात मैत्री ,करुणा आणि बंधू भावाचे भाव जागृत होतात माणूस डोळस होतो ते भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या उजेडात आपले जीवन प्रकाशमान करण्यासाठी येतात बाबासाहेबानी घडवून आणलेल्या करांतीच्या प्रति कृतज्ञाता म्हणून त्यांना नमन केले जाते.डॉ.आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय संविधानाच्या माध्यमातून सन्मानाने आणि भेदभाव रहित जीवन जगण्याचा अधिकार दिला तर धर्मातराने नागरिकांना आपले जीवन सुखी, आनंदी आणि कल्याणकारी करण्याचा मार्ग दाखविला.

डॉ.बाबासाहेब म्हणतात माझे जीवन व जगणे हाच माझा संदेश आहे बाबासाहेब ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर ते एक गतिमान तत्वज्ञान,मानवतावादी विचार आहेत या विचारावर तत्वज्ञानावर चालणारी आपल्या जीवनात प्रगती करू शकतात.धर्मातरामुळे मांणसामांणसातील जातीचे बंधने आणि जातीयत्व शिथिल झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्राती साठी नागपूर शहराचीच का निवड केली?याचे विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात ‘नागपूर हे नागवनशीय बौद्ध लोकांचे मुख्य स्थान होते या नागलोकांची वस्ती नागपूरच्या आसपास होती त्यामुळेच येथील नाग नदी आणि शहराचे नाव नागपूर असे पडले आहे.बाबासाहेबानी ज्या जागेवर धम्म दीक्षा घेतली त्या जागेवर आज जागतिक दर्जाचे ऐतिहासिक बौद्ध स्तूप उभे झाले आहे. नागपुरात येणारा प्रत्येक भारयीय दिक्षाभूमीला आवर्जून भेट देऊन सामाजिक एकता, लोकशाहीचा संदेश घेऊन जात असतो.हजारो वर्षांच्या अन्याय अत्याचाराचा बदला घेण्याच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातर केले नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

धम्माच्या माध्यमातून देशातील जनतेत बंधुता,मैत्री,भावना रजविण्याचाच त्यांचा विशाल दृष्टिकोन होता. भारत देश आणि भारतीय संस्कृतीच्या प्रेमापोटी त्यांनी भारतीय संस्कृती संवर्धन करण्यासाठी भारतातील च बौद्ध धर्माचा स्वीकार करून आपले राष्ट्रप्रेम सिद्ध केले.धम्मचक्र हे एक दिवस नागपुरात जाऊन गतिमान करण्याचे चक्र नसून जोवर पृथ्वीवर सूर्य आहे तोवर हे धम्म चक्र गतिमान राहिले पाहिजे त्यासाठी बहुजनांना बुद्धांचे कल्याणकारी तत्वज्ञान समजावून सांगणे गरजेचे आहे तशा कार्यक्रमांची आखणी करून लौकिकाला साजेसे करण्याच्या दृष्टीने संघटनांनी आपापल्या परीने कार्य करावे बुद्धांचे तत्वज्ञान येणाऱ्या पिढीत रुजवण्यासाठी विविध प्रशमंजुषा,निबंध,वक्तृत्व,नाट्यलेखन,काव्य लेखन ,चित्रकला अशा स्पर्धा हव्यात या “धम्मचक्र प्रवर्तन दिनी” धम्म प्रचारासाठी प्रत्येकाने माझे कर्त्याव्य काय? माझे योगदान किती? यावर विचार मंथन करणे आवश्यक आहे.

✒️शब्दबद्ध:-आयु.शोभा सिद्धार्थ बनसोडे(केंद्रीय शिक्षिका, भारतीय बौद्ध महासभा शाखा माण तालुका)वरकुटे मलवडी,ता.माण,जि. सातारा(मो:-9960992609)

▪️संकलन:-सचिन सरतापे (प्रतिनिधी,म्हसवड,माण)मोबा.9075686100