सुवर्णमहोत्सवी शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

30

🔸पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होते – ग्रंथपाल गोपाल महाजन

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.15ऑक्टोबर):- सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत माळी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.आर.सोनवणे मॅम होत्या.मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती – मिसाईल मॅन – डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम व ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. यावेळी शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व सांगितले व पुस्तक वाचनाने मस्तक सशक्त होते असे प्रतिपादन केले.याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, व्ही.टी.माळी, सी.एम.भोळे, श्रीमती व्ही.पी. वऱ्हाडे, श्रीमती एम.जे. महाजन, अशोक पाटील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी.पाटील तर आभार एस. एन.कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल गोपाल महाजन व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.