गंगाखेड शुगरचा १२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ संपन्न

32

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15ऑक्टोबर):- शुगर अन्ड एनर्जी लि.कारखान्याचा सण २०२१- २०२२ च्या १२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कार्यक्रम विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच१५/१०/२०२१ रोजी सकाळी १०.०० वा.मागील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये कारखान्यात सर्वात जास्त ऊस पुरवठा करणारे प्रगतीशील ऊस उत्पादक शेतकरी श्री.निवृत्ती वाल्मी फड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सयाबाई निवृत्ती फड यांच्या शुभहस्ते तसेच कारखान्याचे प्रशासक,मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या अग्नीप्रदीपण समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे आजचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ अशा शेतकरी व्यक्तींच्या हस्ते करण्यात आला ज्याने सर्वाधिक ऊस गंगाखेड शुगर कारखान्यास देऊन कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील परिसरातील इतर शेतकरी यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. थोडक्यात कारखान्याने कष्ट करणाऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांच्या शुभहस्ते सदरील बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभाचे उद्घाटन करून घेऊन शेतकरी कष्टकरी यांचे प्रतीनिधित्वाला तसेच या जगाचा पोशिंद्याला सन्मान देण्याचे काम केले आहे. शासनाने कोविड-१९ बाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत व अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम पार पडल्याचे दिसत होते.

तसेच कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.राजेंद्र डोंगरे साहेब यांनी गळीत हंगाम २०२१-२०२२ करिता कारखान्याचे कामकाज वेळेत तयारी पूर्ण केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये गाळप होणाऱ्या उसास शासनाच्या नियमाप्रमाणे ( एफ आर पी प्रमाणे ) उसाला भाव हा दिला जाईल असेही जाहीर केले.

तसेच जनसंपर्क अधिकारी श्री.हनुमंत लटपटे यांनी गळीत हंगामाकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस देण्याचे आव्हान केले कारखाना संकटात असतानाही ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचार्‍यांच्या पाठीशी नेहमी उभा राहिल्याचे प्रतिपादन ही त्यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, अधिकारी,कर्मचारी व कामगार उपस्थित होते हा समारंभ उत्साहाने संपन्न होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे सांगून श्री वेरुळकर यांनी आभार व्यक्त केले.