सामान्य घरचा मुलगा अतुल विजयराव जंपलवार यांना LIC क्षेत्रात MDRT (अमेरिका) हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त

43

🔹सलग दुसऱ्या वर्षी हा सन्मान मिळवणारा गोंडपिपरी तहसील मधून पहिला व्यक्ती

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.16ऑक्टोबर):- अतुल जंपलवार यांचे व्यक्तीमत्व म्हणजे लोकांसाठी जीव देणारा. एका सामान्य घराण्यात जन्मलेला मुलगा एवढ्या मोठ्या सन्मान प्राप्त करणे म्हणजे गौरवाची गोष्ट. अतुल जंपलवार हे विठ्ठलवाडा या गावचे रहिवासी गोंडपिपरी शहरातील भारतीय जीवन बीमा निगम (LIC) सल्लागार असले तरी वैयक्तिकरीत्या अनेकांच्या परिचयातील व्यक्ती म्हणून अतुल विजयराव जंपलवार यांचे नाव प्रसिद्धीस आहे.

त्यांचा परिचय द्यायचा म्हणजे विमा सल्लागार सोबतच गोंडपिपरी येथे त्यांचे केस कर्तनालय (Hair Salon) सुद्धा आहे. अतुल भाऊ त्यांच्यापेक्षा वयाने लहान असो की मोठे अशा प्रत्येक व्यक्तीला मान देऊन हसत मुखाने बोलणारे एक व्यक्ती तसेच व्यापारी. मेहनतीच्या स्वबळावर यशाचे शिखर कसे गाठायचे हे एकमेव उदाहरण म्हणजे अतुल जंपलवार यांचे यश.
ते एका सामान्य परिवारातील व्यक्ती आहेत आणि सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा सहभाग असतो, तसेच सामान्य परिवारातील संघर्षमय जीवन जगत त्यांनी गोंडपिपरी तालुक्यामधून सर्वात प्रथम बीमा क्षेत्रातील MDRT (मिलियन डॉलर्स राऊंड टेबल, अमेरिका) हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळविलेला आहे. त्यांना हा सन्मान या आधी वर्ष २०२१ साठी तर सलग दुसर्या वर्षी २०२२ साठी सुद्धा मिळालेला आहे. या सन्मानासाठी अतुल जंपलवार यांनी समस्त वीमाधारक तसेच जनतेचे आभार व्यक केले आहे. जनतेकडून असेच सहकार्य लाभावे अशी अपेक्षा त्यांनी केली व आपल्याला हा सन्मान मिळावा यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतील.

काय आहे MDRT ?

MDRT (मिलियन डॉलर्स राऊंड टेबल) हा सन्मान जीवन विमा एजंट्सची संघटना जे कॅलेंडर वर्षात ०१ दशलक्ष किंवा त्याहून अधिक दर्शनी मूल्याच्या आधारे विमा विकून पात्र ठरतात, अशा लोकांना दिला जातो. या सन्मानासाठी अर्जदार हा नॅशनल असोसिएशन ऑफ इन्शुरन्स अँड फायनान्शियल अॅडव्हायझर्स (NAIFA) चे सदस्य असणे आवश्यक आहे.