संविधानीक मुल्यामुळेच देशाचा विकास झाला – ठाणेदार माळवे

104

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-823995466

उमरखेड(दि.16ऑक्टोबर):-या देश्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व विश्वात सर्व श्रेष्ठ असे संविधान व बौद्ध धम्म दिला हे या देश्यावर त्यांचे उपकार असून त्यांनी दिलेल्या संवैधानीक मुल्याच्या अमलबजावणी मुळेच या देश्या चा विकास झाल्या चे प्रतिपादन ठाणेदार अमोल माळवे यांनी केले.

ते स्थानीक सुमेधबोधी विहारात आयोजीत ६५ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय खडसे हे होते तर अतिथी प्रमुख म्हणुन माजी जि. प. अध्यक्षा प्रतिभा खडसे, नगरसेविका कविता काळबांडे, नगरसेविका सविता पाचकोरे, ॲड. अजय पाईकराव, सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा केशरबाई पाईकराव, विरेंद्र खंदारे हे होते . सुरवातीला जेष्ठ से.नी. मुख्याध्यापक कमलाकर कांबळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.
त्या नंतर महिला मंडळाने उपस्थीतांना पंचशील प्रदान केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात खडसे यांनी, धम्मदिक्षेचे महत्व सांगुन बौद्ध धम्मा मुळे आपला विकास कसा झाला हे सविस्तर सांगीतले.

प्रास्ताविक विहार समितीचे अध्यक्ष डॉ अनिल काळबांडे यांनी करून, विहाराच्या विकासाचा आराखडा सांगून समोरच्या विकासाची दिशा सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . गजानन दामोधर यांनी तर आभार संतोष निथळे यांनी मानले .

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सचिव भिमराव सोनुले , साहेबराव कांबळे, डॉ. धनराज तायडे, राहुल काळबांडे, उत्तम शिंगणकर, व्ही बी भुकतारे यांच्या सह सुमेध बोधी विहार समिती, सावित्रीबाई फुले महिला मंडळाने परिश्रम घेतले.