अन्यायग्रस्त महिलेच्या बहुसंख्य सभासद खंभीरपणे पाठीशी

32

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.17ऑक्टोबर):-प्राथ.शिक्षक सहकारी पतसंस्थेत संगणक आॕपरेटर पदावर सव्वा चार वर्षापासून सौ.संगीता दिपक वरघने या उच्च शिक्षित व अत्यंत गरीब कार्यरत महिला कर्मचाऱ्याला अचानकपणे संस्थेने काढून टाकल्याने पतसंस्थेचे सर्वसामान्य सदस्य कमालीचे व्यथीत व नाराज होते. सदर उच्च शिक्षित आणि लायक महिलेला परत कामावर घेण्यासाठी बहुसंख्य सदस्यांनी अन्यायग्रस्त महिलेच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहून सदर महिलेला परत सेवेत घेण्यासाठी तब्बल ३६२ बहुसंख्य सभासदांच्या स्वाक्षरीचे निवेदन संस्थेला देण्यात आले.

सदर महिलेवर झालेल्या अन्यायाबद्धल संस्थेचे अध्यक्ष मा.जयदेव आसेकर,उपाध्यक्ष संबाजी पारोधे,माजी अध्यक्ष डागाजी बुरीले,व्यवस्थापक तिर्थराज काळे यांचे प्रमुख उपस्थितीत इतंभू चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे सभासद रामचंद्र सालेकर ,धनराज रेवतकर,अशोक टिपले,सुनिल बुरिले,पवणकुमार शर्मा,विजय कामटकर,संतोष धोटे,विनोद आत्राम ,नरहरी बन्सोड…आदिंनी गंभीर चर्चा करुन या लायक व गरीब महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. याप्रसंगी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे मा.अध्यक्षांनी उपस्थित सभासदांना आश्वासन दिले.*
————-