ब्रम्हपुरी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना कार्यकारणी गठीत

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17ऑक्टोबर):- ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत. पण सदर कर्मचारी यांच्या मागणी कडे शासन दुर्लक्ष करत असते. शासन दरबारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही आहे. तालुका स्तरावर संघटन निर्माण करुन संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी आपली बाजू मांडण्यासाठी ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटना एकमताने गठीत करण्यात आली.

या संघटनेचे अध्यक्ष म्हणून एकनाथ गोठे, उपाध्यक्ष नेपाळ हुमने, सचिव नितीन किनेकर, हिरालाल माकडे, सह सचिव ज्ञानेश्वर राऊत, कोषाध्यक्ष तोजराम राऊत, सहकोषाध्यक्ष सुरज टेंभुरकर, संघटक गुरू गेडाम, संघटक संजय चौधरी, कैलास पत्रे, मुकेश ढोरे, हरीदास खरकाटे, अरविंद माढरे, नरेंद्र ठाकरे, किशोर ढोरे, सोमेश्वर मोहुर्ले, संदीप कुत्तमारे, गायत्री ठेंगरी, तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.