जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव/ति येथे मान. आर आर. अगडे सर यांच्या कृतज्ञेचा आणि दातृत्वाचा अनोखा आविष्कार

33

*केंद्राचा आधारस्तंभ*
*शिक्षकांचा पथदर्शी*
*मातृत्वाचा अमोल झरा*
*आदर्शवत शिक्षण महर्षी*

मोठ्या मनातील असामान्य कृतज्ञता व्यक्त करणारा आगळावेगळा कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्रीय शाळा मोहगाव तील्ली येथे आज पार पडला. सर्व शिक्षक बांधवांना एक अनोखी भेटवस्तू देऊन त्यांचा शुभाशिष दिला. ऑक्टोबर महिन्यात सरांना नुकतेच 58 वर्षे पूर्ण होऊन ते सेवानिवृत्ती होणार आहेत .सोबत कार्य केल्यामुळे अनोखे भावविश्व निर्माण झाले आहे.एक शिक्षणवत्सल ,आदर्श गटप्रमुख मान.. आर. आर. अगडे सर एक उत्कृष्ट व्यासंगी ,कार्य कुशल, कर्तव्यदक्ष , दातृत्व वान, विद्यार्थीप्रिय तसेच शिक्षण प्रेमी आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शक, पथदर्शी एक मित्र म्हणून त्यांचा नावलौकिक आहे . सरांनी आपल्या प्रेमाचं प्रतीक, सर्व शिक्षकांना प्रती असणारा जिव्हाळा आजच्या कार्यक्रमात व्यक्त केला.

सुरुवातीपासून ते आज पर्यंत केलेल्या कार्याला तसेच स्वतः काय शिकत गेलेत- आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्याला सामोरे जाण्यासाठी केलेले प्रयत्न या साऱ्या गोष्टीना उजाळा दिला.

सरांनी केंद्रातील 40 शिक्षकांना एक insulated वॉटर बॉटल देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली .आमच्यासोबत घालवलेल्या गोड कडू आठवणींना उजाळा दिला .हसत खेळत इथपर्यंतचा प्रवास कधी काटेरी तर कधी सुखकर होत गेल्याचे मत मांडले. मान. निरंजन राठोड सर विषय शिक्षक चील्हाटी हे आजच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आले. सरांनी प्रत्येकाला एक भेटवस्तू देऊन आपल्या दातृत्वाचा परिचय करून दिला सरांच्या कार्याला कोटी कोटी सलाम. एक प्रमुख आपल्या कौशल्याने व उत्कृष्ट कार्यशैलीने संपूर्ण केंद्रातील शिक्षकांना आपलेसे करून समर्थ धुरा सांभाळली.

*तुमच्याकडून शिकावे*
*कर्तुत्वरुपी उरणे*
*ध्येय आदर्श बाळगावे*
*आयुष्य जगूनी सेवेने*
*मार्गदर्शक जीवनातील*
*पथदर्शी तुम्ही आमचे*
*दीपमाळ वाटेतील*
*सन्मानाने जगण्याचे*
*ऋणी तुमच्या ज्ञानाचा*
*महर्षी तुम्ही शिक्षणाचे*

✒️लेखक:-राजेन्द्र बनसोड(सहायक शिक्षक,जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा पंचायत समिती गोरेगाव जिल्हा परिषद गोंदिया)