ज्या धंद्याने त्याचे पोट भरले त्याच धंद्याने त्याचा जीव घेतला

27

🔸धामणगाव येथील राजू बोरकुटे यांचा शॉक लागून मृत्यू

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

भंगाराम तळोधी(दि.18ऑक्टोबर):- गरीब म्हणून जन्माला आलो असलो तरी मी गरीब म्हणून मरणार नाही, दुःखाला आपलंसं करेन, रक्ताचा घाम करेन, असा आत्मविश्वास. आयुष्याच्या प्रत्येक संकटाला मात करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या व्यक्ती म्हणजे राजू बोरकुटबलहानपणापासूनच मेहनती व्यक्ती, वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत गावाबाहेर राहून स्वतः मेहनत करून शिक्षण घेतले. दुसऱ्याकडे नोकर राहून त्याने थोडेसे पैसे जमा केले. कोणतीही वाईट सवयी त्याच्या अंगात नाही. एक एक पैसा जमा करून बाहेर किती दिवस आपण राहायचं आपल्या गावात आपण काहीतरी व्यवसाय चालू करावा, असा विचार करून तो गावात आला. सुरुवातीला छोटा आटो घेतला. त्यानंतर आपल्या मेहनतीने दुसऱ्याची शेती भाड्याने घेऊन व मेहनत करत एक एक पैसा जमा करून घरी किराणा दुकान टाकले. त्यासोबतच लहान पीठ गिरणी (चक्की) टाकला. त्याच्या आयुष्यात अनेक संकटे आली. परंतु तो घाबरला नाही.

मात्र 17/10/2021 हा दिवस राजू बोरकुटे यांच्या जीवनातला शेवटचा ठरला. रोजच्यासारखं सकाळी उठून तयारी करून आपला दुकान चालू केला. मात्र काही वेळानंतर त्याच्या घरची लाईन गेली चक्की कडे कुठं काय झालं असेल या विचाराने तो लाईन तपासण्यासाठी गेला. कुणाला माहीत त्याचा काळच त्याला बोलवत होते. तो तपासण्यासाठी गेला आणि तिथेच त्याला शॉक लागला. त्याला झटकन तिथून फेकून दिले. एवढ्या जोरात पडला की त्याच्या तोंडातून – नाकातून रक्ताची धार लागली. त्यानंतर लगेच त्याला जवळच्या गोंडपिपरी येथील सरकारी दवाखान्यात भरती केले.मात्र तो वाचू शकला नाही.

‘जीवनाच्या वाटेवर धावपळ करणारा राजू बोरकुटे नशिबाच्या खेळात मात्र हरला’. राजू बोरकुटे याला दोन मुली आणि एक 2 वर्षाचा मुलगा त्याचे मुले एकदम लहान. महत्त्वाचा कमावता व्यक्ती गेल्याने त्याच्या घरी दुःखाचे डोंगर उभे झाले आहे. गावातला जवान व्यक्ती गेल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची चौकशी गोंडपिपरी तालुक्याचे पोलीस अधीक्षक जीवन राजगुरू साहेब, पोलीस अधिकारी शामराव पुलगमकार साहेब, आणि MSEB अधिकारी, यांनी प्राथमिक चौकशी केली असून याचा अधिक तपास सुरू आहे.