पट्टीवडगाव येथे स्व.पंडितआण्णा मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर ; डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

88

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी वैजनाथ(दि.20ऑक्टोबर):- तालुक्यातील पट्टीवडगाव येथे धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाच्या वतीने कै.पंडित आण्णा मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर डॉ.संतोष मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.शिबिरात शुगर,बी पी असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच सर्वरोग निदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे आयोजन राजाभाऊ लव्हारे यांनी केले होते.या शिबिरात 162 रुग्णांनी लाभ घेतला.रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आले.नेत्र रुग्णांची नोंदणी करून मोफत आँपरेशन केले जाईल अशी ग्वाही डॉ संतोष मुंडे यांनी दिली.

डॉ. संतोष मुंडे यांनी गावातील दिव्यांग बांधवांच्या समस्या निराकारण जागेवरच केले. यावेळी, हरिश्चंद्र लव्हारे, ज्ञानोबा लव्हारे, बळीराम लव्हारे, परमेश्वर वाकडे,बंडू कुलकर्णी, बाबु सखुराम, मोहन फुके, नफीस मगदुम शेख, शंकर प्रभाकर कुलकर्णी, अशोक अंबाजी लव्हारे, बाबुराव समुखराव रानबा, अय्याज रसुल शेख, स्वपनाली नागनाथ कांबळे, अनिल विश्वाभर लव्हारे, मयुरी, भागवत मुंडे, सोनाली, केरबा तरकसे, शिवम राजाभाऊ लव्हारे, रूमा मोहन वाकडे, परमेश्वर सिद्राम तरकसे, अरविंद केरबा घोडके, नविद इस्माईल शेख, गोपाळ शिवाजी तरकसे आदी उपस्थित होते.