सुफी संत हजरत तातार शाह बाबा यांच्या उर्स च्या निमित्त ‘रोग निदान शिबिर ‘

🔸ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

🔹एम आय एम चा स्तुत्य उपक्रम

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड:- (दि. 19 ऑक्टोबर):-येथील हजरत तातार शहा बाबा यांच्या उर्स च्या निमित्त सर्व जनतेसाठी रोग निदान शिबिराचे व मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन एम आय एम तर्फे करण्यात आले होते.

हजरत तातार शहा बाबा हे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून मानले जाते. तातार शहा बाबा यांच्या दरबारात सर्वांच्या मनोकामना पूर्ण केली जाते असे म्हटले जाते. सुफी संत तातार शहा बाबा हे सर्वीकडे परिचित आहे.

या उर्स चे औचित्य साधून एम . आय .एम. पक्षाच्या वतीने उमरखेड नगरीतील जनते साठी रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याच बरोबर ईद-ए-मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर(स.)यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर सुद्धा घेण्यात आले.

रोग निदान शिबिरात अस्थिरोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, मधुमेह तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, छाती विकार तज्ञ व डोळे तपासणी असे विविध आजारासाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून दिले होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून फेरोज लाला (मराठवाडा अध्यक्ष एम आय . एम ) व कलीम रमजानी (मराठवाडा जनरल सेक्रेटरी एम आय एम) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

तर रक्तदान शिबिराचे उदघाटन उमरखेड पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री माळवे यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष सय्यद इरफान ताऊ,एजाज जनाब (तालुका अध्यक्ष )) नगरसेवक तथा गटनेता जलील कुरेशी, नगरसेवक मुजीब बागवान, नगरसेवक रसूल पटेल, नगरसेवक सय्यद अफसर, . प्रतिनिधी अन्सार भाई,प्रतिनिधी वसीम भाई, प्रतिनिधी इरफान भाई, अहेमद पटेल, वजाहत मुजावर, अजीज पटेल, अजीम भाई व सर्व एम आय एम.पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED