कृतज्ञता मेळाव्यात लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- गणेश भैय्या चिंचाणे

31

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.20ऑक्टोबर):- येथे कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.ओबीसीचे नेते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे ओबीसींच्या आरक्षणात अध्यादेश काढून संरक्षण दिल्याबद्दल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड आयोजित कृतज्ञता मेळावा माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसीचे राजकीय नेते तथा महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व छगन रावजी भुजबळ साहेब व धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री , शनिवार 23 ऑक्टोबर 2021रोजी एक वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे होणार आहे.

एडवोकेट सुभाष भाऊ राऊत व छगनरावजी भुजबळ साहेब यांनी सातत्याने ओबीसींच्या हक्कासाठी लढा देण्याचे काम केले आहे तमाम ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करण्यासाठी संसदेच्या सभागृहात मागणी केली आहे त्या मुळे भुजबळ साहेब यांचा कृतज्ञता मेळावा सुभाष भाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठेवण्यात आला आहे तरी बीड जिल्हातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समता परिषद चे युवा नेते गणेश भैय्या चिंचाणे यांनी केले