टाकरवण बस सेवा सुरू करण्यासाठी आगार प्रमुख यांना निवेदन

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.21ऑक्टोबर):-बससेवा सुरू झाल्यास टाकरवण सर्कल मधील व आस पासच्या खेडेगावातील नागरिक, विद्यार्थी, युवक ये जा करणाऱ्या नागरिकांचा खूप मोठा प्रश्न मार्गी लागेल, मंडळाला व जनतेला या बस सेवेचा फायदा होईल.

याबाबत सविस्तर चर्चा करून मा. साहेबांनी सर्व विषय पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, व लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासित केले , यावेळी निवेदनात सविस्तर असे म्हटले आहे की, बस सकाळी ७ वाजता दुपारी १२ वाजता व संध्याकाळी ५ वाजता सोडण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे आगार प्रमुख यांना केली आहे.

सदरील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब, बीड जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजयसिंह पंडित साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली दिले आहे, यावेळी युवक काँग्रेसचे ततालुकाध्यक्ष त्रषिकेश बेदरे, उपाध्यक्ष रवी शिर्के, अलीम सय्यद, वसीम फारूकी, अमोल राठोड, रूद्रा घोलप, महेश व आदी सहकारी उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED