शब्दशिल्प कलाविष्कार संघ आयोजित शरद पौर्णिमा प्रथम राज्यस्तरीय ऑनलाईन मैफिल सुरांची उत्साहात संपन्न

30

✒️अंगद दराडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.21ऑक्टोबर):-शब्दशिल्प कलाविष्कार संघ आयोजित शरद पौर्णिमा राज्यस्तरीय प्रथम ऑनलाईन मैफिल सुरांची दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी चार ते साडे सात या वेळात गुगल मीटवर आयोजित करण्यात आली होती. ह्या मैफिलीचे अध्यक्षस्थान उत्कृष्ट झी वाहिनी वक्ते गणेश शिंदे यांनी भूषविले.

तसेच प्रमुख अतिथी म्हणुन नवोदित पटकथा लेखिका योगिता तकतराव व नवोदित अभिनेता तथा दिग्दर्शक चिन्मय मायदेव आणि बालकलाकार राधिका गोडबोले उपस्थित होते. निमंत्रित मान्यवर कवी/कवयित्री शोभा कोठावदे, अमेय तलवारे, विकास पालवे, उषाश्री बागडे, सचिन पाटील, मयूर पालकर, आम्रपाली धेंडे यांनी उत्कृष्ट गीत सादर करून मैफिलीची रंगत वाढवली. ह्या सुरमय मैफिलीचे स्वागताध्यक्ष पद शब्दशिल्प कलाविष्कार संघ अध्यक्षा सौ अलका येवले यांनी भूषविले आणि प्रास्ताविक केले. मैफिलीची सुरवात संस्कृत श्लोकानी झाली. अध्यक्ष गणेश शिंदेंनी संगीत ही सकारात्मकता जागविणारी कला आहे असे सांगुन मोलाचे मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे योगिता तकतराव, चिन्मय मायदेव आणि राधिका गोडबोलेंनीही गाणी सादर केली.

महाराष्ट्रातून पस्तीस कवी व कवयित्री यांनी मराठी, हिंदी, पोवारी, अहिराणी तसेच स्वरचित गाणी, जोगवा, गोंधळ, पोवाडा अशी गाणी सादर करून मैफिलीची रंगत वाढवली. ह्या सोहळ्याचे आयोजन अवघ्या दोन दिवसात शब्दशिल्प आयोजक सदस्य चंदन तरवडे यांच्या संकल्पनेतून शब्दशिल्प कलाविष्कार संघ अध्यक्षा अलका येवले, कार्याध्यक्षा गीतांजली वाणी व आयोजक सदस्य भाग्यश्री बागड, मयूर पालकर यांनी केले होते.

चंदन तरवडे आणि भाग्यश्री बागड यांनी सुमधूर आवाजात निवेदन करून काव्य मैफिल बहारदार बनवली. आभार कार्याध्यक्षा गीतांजली वाणी यांनी मानले. सुरांच्या मैफिलीत सरला सोनजे, गोवर्धन बिसेन, कालिंदी वाणी, प्रतिभा विभुते, अनघा सावर्डेकर, सुरेखा बामणकर, अंजली गुंजोटे,
विमल बागडे, संगिता मुसळे, आशा नष्टे, राजश्री वाणी मराठे, अलका पितृभक्त, निता शेंडे, प्रतिभा नेरकर, सुनंदा सोंजे,
विजया शिंदे, संध्याराणी कोल्हे, दीपाली वाणी, स्मिता भीमनवार, रोहिणी इनामदार, लता पुरकर,
कविता मालपुरे, गीतांजली सटाणेकर, वासंती बोराडे,
अर्चना नावरकर ह्या सर्वांनी गाणी सादर केली.