दोंडाईचा शहर युवासेनेच्या वतीने पी बी बागल महाविद्यालयात एक दिवसीय लसीकरण शिबीर संपन्न

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.22ऑक्टोबर):- दिनांक 21 ऑक्टोबर 2021 गुरुवार रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार महाविद्यालयीन 18 वर्षावरील विद्यार्थ्यांचे एकदिवसीय लसीकरण शिबीर दोंडाईचा शहरातील श्रीमती पर्वताबाई बाजीराव बागल महाविद्यालयात युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांच्या संकल्पनेतून व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे युवासेना सहसचिव पंकज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालय प्रशासन, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा एन.सी.सी एन.एस.एस दोंडाईचा युनिट व युवासेना दोंडाईचा शहर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले तर प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचे मा.नगरअध्यक्ष डॉ.रविंद्र देशमुख बागल महाविद्यालयाचे सचिव अमित पाटील, मा.नगरसेवक दिलीप पाटील, भूपेंद्र धनगर, रवी पाटील, जे पी गिरासे, एन.सी.सी चे विश्वास पाटील,मालीच सर, डॉ आठवले सर, भोयवार सर डॉ ललित चंद्रे हे उपस्थित होते, व शिवसेनेचे उपजिल्हा संघटक कल्याण बागल, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, युवासेना शहरप्रमुख सागर पवार, उपतालुका प्रमुख, जगदीश पाटील, सुमित देशमुख, प्रदीप पवार, उपशहर युवाधिकारी, भुषण चौधरी, योगेश बोरसे, दीपक मराठे, विभाग प्रमुख रोहित धनगर संदीप कोळी नरेंद्र धात्रक, भारत कोळी, सनी कोळी, विठोबा ठाकूर, चेतन चौधरी, निलेश सातोडे,बब्बलू कोळी, व शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते….

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 
©️ALL RIGHT RESERVED