खेड्यात बसफेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांची गोची

28

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.25ऑक्टोबर):-जिल्ह्यात आगोदर रस्त्याचा कुठलाही विकास नसताना ग्रामीण भागात राज्याची लोकवाहिनी असलेली एस.टी. सुरळीतपणे चालू होती. मात्र आज परिवहन विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे आज ग्रामीण भागात वाहतुकीसाठी व दळणवळणाच्या दृष्टीने चांगले रस्ते असतांना सुद्धा एस.टी सेवा मिळत नसल्याची ओरड ग्रामीण जनता करीत आहे .अनेक खेड्यात या बस सायंकाळी मुक्कामी राहत होत्या. तेव्हा त्या खेड्यातील लोकांना सकाळीच तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी सोयीचे होत होते.

आजच्या काळात वाहतुकीसाठी सर्वत्र रस्ते चांगले आहे.परंतु परिवहन विभागाच्या दुर्लक्षित धोरणाने ग्रामीण भागातील खेड्यात चालणाऱ्या बसफेऱ्या चक्क बंदच असल्याचे दिसून येते. यामुळे ग्रामीण जनता हैराण झाले आहे. परिवहन विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा आडोसा घेऊन या खेड्यातून खाजगी अवैधरित्या वाहतूक करणारी वाहने परिवहन विभागाच्या आशीर्वादाने राजरोसपणे धावत आहे. लाँकडाऊन व अनलाँक प्रक्रियेच्या कालावधीमध्ये एस.टी. सेवा पूर्णतः बंद होत्या त्यानंतर टप्प्या टप्प्याने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. सुरू झालेली बस सेवा अचानक बंद झाल्याने येन सणाच्या सुदिच्या दिवसात ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे.