✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26ऑक्टोबर):- तालुक्यातील खादगाव येथिल शेतकरी शंभुदेव जनार्धन फड वय ५३ वर्ष या शेतक-यानी शेतातील पिकाचे नुकसान झाल्यामुळे तसेच .भारतीय स्टेट बॅकेतील काढलेले कर्ज आणी वाढत जाणारे त्यावरील व्याज कसे फेडावे याची काळजी मुळे दि.२३ ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री १० वाजता पोलिस स्टेशन समोर माऊली हाँटेलच्या पाठीमागे आसलेल्या रेल्वेगेट जवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.दि.२४ ऑक्टोबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोद केली आहे.

शेतीत दर वर्षी होत असलेल्या  नापिकेने आर्थिक नुकसान होत गेले.आर्थिक नुकसान होत असल्याने कुटूबियांची उपजीवेकेचा प्रश्न,शेतीत मशागतीचा खर्च कसा भागवावा हि चिंता सतावत होती.तसेच भारतीय स्टेट बँकेचे कर्ज व वाढत जाणारे व्याज कसे फेडावे या विवंचनेतुन शंभुदेव जनार्धन फड या शेतक-याने आत्महत्या केली.गंगाखेड पोलीस ठाण्यात महादेव फड याने खबर दिल्यावरून आकस्मित मृत्यू नोद केली.मयताच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली,दोन भाऊ असा परिवार आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED