✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26ऑक्टोबर):-कला,वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय गंगाखेडचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग ,सार्वजनिक आरोग्य विभाग गंगाखेड व नेहरु युवा केंद्र परभणी यांच्या संयुक्त विध्यमाने आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लसिकरणाला सुरुवात झाली.लसिकरण कार्यक्रमाची सुरुवात संत जनाबाई यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात लसिकरण झाले आहे व शाळा व माहाविद्यालये मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांचे लसिकरण राहीले आहे त्या विद्यार्थ्यांचे लसिकरण 100% पूर्ण करण्याचे प्रशासनाने योजिले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आज संत जनाबाई संस्थेचे कला ,वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय गंगाखेड येथे प्रत्यक्ष लसिकरणास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रचार्य बी.एम धुत सर यांनी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी ,विद्यार्थी यांना लसिकरण करुण घेण्यास सांगितले,कार्यक्रमाचे प्रमुख पाव्हणे गंगाखेड तहसिल येथिल नायब तहसिलदार मा.आवाळे सर यांनी मनोगत व्यक्त करुन लसिकरण मोहिमेला शुभेच्छा दिल्या. एन एस,एस विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुर्वे सर यांनी जोपर्यंत महाविद्यालयातील लसीकरण 100% होत नाही तो पर्यंत महाविद्यालयात लसिकरण कँम्प सुरु ठेवण्यात येईल असे सांगुन या लसिकरण मोहीमेला शुभेच्छा देण्यात आल्या.त्याच बरोबर आरोग्य विभागाने प्रत्यक्ष महाविद्यालयातच लसिकरणाची व्यवस्था करुन दिली त्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

त्याच बरोबर डॉ.प्रा.उजळंबे सर , आरोग्य अधिकारी यांनीही कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.त्याच बरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणी नेहरु युवा केंद्र चे स्वयंसेवक यांनी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन लसिकरणाची जनजागृती केली व विद्यार्थ्यांना लस घेऊन स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे कोरोना पासुन रक्षण करावे ,या कोरोणा महामरीतुन बचाव करण्यासाठी लसिकरण हा एकमेव उपाय आहे या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन महाविद्यालयातील विद्यार्थी यांचे 100% लसिकरण करण्याचे आव्हान करण्यात आले.

यावेळी आजच्या कोवीड 19 लसिकरण मोहीमेचे कार्यक्रम प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.डॉ सुर्वे सर ,महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एम धुत सर ,प्रा.बेले सर ,
प्रा.डॉ. उप-प्राचार्य चंद्रकांत सातपुते सर ,उप प्राचार्य भगवान भोसले सर ,नेहरु युवा केंद्र चे प्रभाकर माळवे सचिन राठोड ,प्रतिक्षा वझे व आरोग्य विभागाचे मनोज नाव्हेकर ,अनुसया भेंडेकर ,केंद्रे मॕडम ,चिवळे मॕडम,टोंम्पे मॕडम मोठ्या प्रमाणात एन.एस.एस स्वयंसेवक उपस्थित होते .

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED