✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.26ऑक्टोबर): – तालुक्यातील ईल्लुर ठाकरी येथे बीएसएनएल व एका खाजगी कंपनी चे टावर आहे मात्र त्यांची रेंज राहत नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन ची कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामुळे या दोन्ही टावर ची रेंज वाढवण्यासाठी ईल्लुर ठाकरी येथील नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ रुपालीताई पंदीलवार यांना निवेदन देऊन ही समस्या सोडवण्यासाठी मागणी केली.

जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ रुपालीताई पंदीलवार व सामाजिक कार्यकर्ते श्री संजय पंदीलवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रेंज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास तसेच नोकरी संदर्भात अर्ज करण्यास व ऑनलाइन ची कामे आहेत या भागात अनेक भ्रमणध्वनी धारक आहेत त्यांनाही कवरेज समस्येचा सामना करावा लागत आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED