सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात विद्यार्थी कुस्तीपटू यांचा गौरव

26

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.26ऑक्टोबर):- येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी या वर्गातील ऋषिकेश गोरख महाजन व इयत्ता सातवी या वर्गातील कृष्णा गोरख महाजन ह्या दोघ भावांनी अतिशय अथक मेहनतीने “आत्मा मालिक एज्युकेशन स्पोर्ट कोकमठाण या स्पोर्ट अकॅडमी कॉम्पिटिशन मध्ये कुस्ती या खेळ प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत क्रमशः दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले.

व पुढील स्पर्धेसाठी निवड झाली त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, व संस्थेचे जेष्ठ संचालक काकासाहेब ध्रुवसिंग बयस यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव प्रा. रमेश महाजन ,उपाध्यक्ष अंकुश पाटील त्याचप्रमाणे सन्माननीय सर्व संचालक मंडळ माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही.बी. पाटील, तसेच क्रीडा शिक्षक एस.एल.सूर्यवंशी क्रीडा शिक्षक कैलास माळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक गोरख महाजन हे सुद्धा उपस्थित होते