निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ निवृत्ती वेतन द्या : रिपाइंची तहसीलदाराकडे मागणी

31

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.26ऑक्टोबर):-जिल्ह्यातील केज तालुक्यातील निराधार, दिव्यांग, श्रावणबाळ व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांची बँकेकडून होत असलेली अडवणूक थांबवून त्यांना तात्काळ अनुदान देण्याची मागणी रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांची भेट घेऊन केली आहे.या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील दिव्यांग, निराधार, श्रावणबाळ व इंदिरागांधी वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांची संबंधित बँकेकडून अडवणूक होत आहे.

त्यांना वेळेवर निवृत्तिवेतन व अनुदान दिले जात नसल्याने त्यांना दिवाळीचा सणाला तरी अनुदान देण्यात यावे. या मागणीसाठी दि. २६ ऑक्टोबर रोजी रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे व राहुल सरवदे यांनी तहसीलदार मेंडके यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात दिपक कांबळे राहुल सरवदे यांचे सोबत भास्कर मस्के, रवींद्र जोगदंड, बाळासाहेब ओव्हाळ, दिलीप बन्सोड, कल्याण घोडके, रमेश निशीगंध, बाळासाहेब कांबळे, सुमीत कांबळे, कैलास जावळे, मिलिंद भालेराव, संभाजी हजारे, रोहीत कांबळे, रवी गायसमुद्रे हे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान ता प्रसंगी तहसीलदार मेंडके यांनी शिष्टमंडळाला यावर उचित कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.