गंगाबाई तलमले महाविद्यालयात कायदेविषयक कार्यक्रम संपन्न

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.27ऑक्टोबर):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती ब्रम्हपुरी अंतर्गत मा.न्यायाधीश एम.जी.मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यानिमित्ताने ऑनलाइन पध्दतीने प्रोजेक्टरवर माहितीपट दाखवण्यात आले तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘दारू पिऊन वाहन चालवल्याममुळे होणारे अपघात आणि मृत्यू’ या विषयावर पथनाट्य सादर करून वाहतुकीचे नियम पाळा असा मोलाचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एम.जी.मोरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मुलभूत हक्क आणि अधिकार तसेच पर्यावरण संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधून सखोल मार्गदर्शन केले.याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले सर आणि माजी प्राचार्य भाऊरावजी राऊत सर उपस्थित होते.

ॲड.आशिष गोंडाने यांनी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यामागचा हेतू आणि भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की विद्यार्थी हा देशाचा भविष्य आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये कायदे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होऊन देशसेवा घडावी यावर प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अश्विनी बोरकुटे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.दोनाडकर सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता न्यायालयीन कर्मचारी एच.जी खोब्रागडे(वरिष्ठ लिपिक),साबेर काझी (कनिष्ठ लिपिक),नरेश पेंदोर (शिपाई)तर पोलीस विभागातर्फे पो.हवा सुदेश कुमरे,प्रकाश दुफारे यांच्यासमवतेत महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.