राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचे ब्रम्हपुरी नगरीत जंगी स्वागत

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.27ऑक्टोबर):-राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचे ब्रम्हपुरी येथे आज़ सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव कृपाल मेश्राम, ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष जगदीश उर्फ मोंटू पिलारे, रा. यु. काँ. जिल्हा सचिव अतुल राऊत रा. यु. काँ. चे तालुका अध्यक्ष अश्विन उपासे, शहर अध्यक्ष मनोज वझाडे, किसान सेल चे अध्यक्ष दूधराम आकरे, सुधीर पिलारे, जनता ठेंगरी, नोगेश बगमारे, राजेश माटे, अमोल ठेंगरी प्रसाद शिवणकर, राकेश शेंडे, प्रफुल करंडे, राहुल भोयर, सरदार बेग, मनमोहन मिसार, पिंटू सोंदरकर, प्रणय बेद्रे, मिथुन चौधरी, आदेश मालोदे, प्रफुल डोईजड, गजानन नवलाखे, प्रकाश अंबादे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.