उत्तम बोडखे यांनी साहित्यविश्वाला समृद्ध बनविले – मा.आ.भीमराव धोंडे

34

🔸कड्याच्या ऐतिहासिक बाबाजी महाविद्यालयात रंगलेला कौतुक सोहळा

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.28ऑक्टोबर):-सत्य,शांती,त्याग,सेवा या मूल्यांचे उपासक आणि थोर तत्वचिंतक… राजकीय,सामाजिक,धार्मिक आदीसह विविध क्षेत्रातील अभ्यासक,वरिष्ठ पत्रकार,उपसंपादक उत्तम बोडखे यांनी आष्टी तालुक्यातील साहित्य क्षेत्र प्रगल्भ आणि समृद्ध बनवले..अशा गौरवपूर्ण शब्दात आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी यथोचित सन्मान केला.आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण,राजकीय आदीसह क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार उत्तम बोडखे यांची दैनिक झुंजार नेताच्या उपसंपादकपदी निवड झाल्याबद्दल गौरव सोहळा आयोजित केला.त्याप्रसंगी कौतुक करताना माजी आ.भीमराव धोंडे बोलत होते.अध्यक्षस्थानी कड्याचे सरपंच अनिलतात्या ढोबळे होते तर व्यासपीठावर भारत सरकारचे क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांचे स्वच्छ भारत मिशन विशेष प्रचार अभियानाचे विभागीय प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये,गायकवाड,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,भाजपचे जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख,शाहिर तुकाराम काळे,सेवानिवृत केंद्रप्रमुख पवळे उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,स्व.आनंदराव धोंडे यांच्या प्रतिमेला नतमस्तक होत मंचावरील मान्यवरांनी पूजन केले.उत्तम बोडखे हे आष्टी,पाटोदा,शिरूर सह बीड जिल्ह्यातील लेखणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.किंबहूना शब्द ही पत्रकार,साहित्यिकांची ताकद असते..असे सांगून उत्तम बोडखे यांनी आष्टी तालुक्याच्या गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राजकीय व्यवस्था आणि सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे.समृद्ध पत्रकारिता कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे बोडखे यांची समृद्ध पत्रकारिता आहे..!

असे सांगत भविष्यात उत्तम बोडखे यांच्या लेखणीला बळ मिळावे अशा सदिच्छा माजी आ.भीमराव धोंडे यांनी दिल्या.कड्याचे सरपंच अनिलतात्या ढोबळे यांनी उत्तम बोडखे यांच्या लेखणी क्षेत्रातील कार्य कीर्तीचा आम्हाला सदैव अभिमान वाटतो.त्यांची सकारात्मक,दिशा देणारी आणि प्रगतीच्या वाटचाल करायला लावणारी पत्रकारिता आम्हा राजकारण्यांना योग्य दिशा देते.त्यांनी वर्तवलेले राजकीय संकेत सत्यात उतरतात हे उदाहरणादाखल सांगितले.प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी उत्तम बोडखे या अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल गौरवोउद्गार काढत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तम बोडखे यांचा सत्कार करण्याची संधी म्हणजे ‘दिवाळी पूर्वी ची दिवाळी असल्याचे सांगितले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रतिसाद दिला.बोडखे यांनी दिवाळी अंक,वृत्तपत्रामधील विविध राजकीय वार्तापत्र,शैक्षणिक घडामोडी,गुणवंताचा गौरव आदीसह सर्व क्षेत्राला सकारात्मक न्याय दिला.

दैनिक झुंजार नेताने त्यांची केलेली उपसंपादकपदी निवड ही सातत्य,निष्ठा आणि लेखणीचा सन्मान असल्याचे ते म्हणाले.यावेळी विभागीय प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये यांनीही मार्गदर्शन केले.या कौतुक सोहळ्याला माजी आ.भीमराव धोंडे,कड्याचे सरपंच अनिल ढोबळे,आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा सरचिटणीस देशमुख,यांच्यासह राजकीय,सामाजिक,धार्मिक,वैचारिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सय्यद यांनी तर आभार प्रा.डॉ.सज्जन गायकवाड यांनी मानले.
———————————————-
ज्ञान मंदिरातील कौतुक
सोहळ्याने बोडखे गहिवरले!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कडा येथील उच्च दर्जाच्या आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी वरिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात रंगलेल्या कौतुक सोहळ्यामध्ये माजी आ.भीमराव धोंडे,सरपंच अनिलतात्या ढोबळे आणि प्राचार्य डॉ.विधाते यांच्या पाठीवरील कौतुकाच्या वर्षावाने पत्रकार उत्तम बोडखे अक्षरश: गहिवरले!’
———————————————-

बोडखे म्हणजे उत्तम,सकारात्मक लेखणीचा दीपस्तंभ!’
सर्व जाती,धर्म,पंथ यांना बरोबर घेत संत,महंता सह गुणवंतांना न्याय आणि अन्यायाला वाचा फोडणारे आणि सर्वांना न्याय,योग्य दिशा देणारा दैदिप्यमान हिरा आणि दीपस्तंभ आहेत.त्यांची सकारात्मक लेखणी वाचकांना दिशा देते..!
अनिलतात्या ढोबळे
(सरपंच,कडा)