आझाद हिंदच्या आमरण उपोषण आंदोलनाची सहाव्या दिवशी यशस्वी सांगता

71

🔸मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश

✒️बुलडाणा प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

बुलढाणा(दि.29ऑक्टोबर):-आझाद हिंद सरकारच्या स्थापना दिनापासून शेतकरी शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी उभारण्यात आलेल्या आमरण उपोषण आंदोलनाची अखेर सहाव्या दिवशी यशस्वी सांगता करण्यात आली .उपवनसंरक्षक कार्यालयातील गैरकारभाराच्या,उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या ऑक्टोंबर 2020 पासून आज पर्यंतच्या सर्व तक्रारींची, नियमबाह्य बदल्यांची यासह इतर मागण्यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी 26 ऑक्टोंबरला सायंकाळी दिले.सदर चौकशीचे आदेश पत्र प्रधान सचिव वनविभाग मंत्रालय, प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल नागपूर, विभागीय वनसंरक्षक अमरावती यांना दिले आहे.

जिल्हाधिकारी एस रामामूर्ति, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्या निपक्ष चौकशीतून सदर आदेश पारित झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाचे अधीक्षक तहसीलदार करे यांनी उपोषण मंडपात येऊन स्वतः आदेशाचे पत्र दिले.उपवनसंरक्षक कार्यालयातील वनमजूर लिलाबाई दामोदर आणि ईमरान शाह यांना नियमानुसार लवकरच सेवेत सामावून घेण्याचे पत्रही उपवनसंरक्षक कार्यालयातून जिल्हाधिकारी बुलढाणा गृह विभागात प्राप्त झाले आहे.

उपोषणाची यशस्वीता म्हणजे आझाद हिंदच्या राज्यातील प्रत्येकाचा विजय असल्याची प्रतिक्रिया यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.सतीशचंद्र रोठे यांनी व्यक्त केली.यावेळी आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सौ सुरेखा निकाळजे प्रदेश महासचिव संजय चांडोले जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई दातरकर विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र ससाने,आदेश कांडेलकर,शेख अजर, छाया आराख यासह शहरातील सामाजिक, राजकीय प्रतिनिधी,पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.