केज उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थान परिसरात जंगलाचे स्वरुप

27

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:;8080942185

बीड(दि.31ऑक्टोबर):- जिल्ह्यातील केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी ह्या निवासस्थानात कसे राहात असतील. हा प्रश्न पडला आहे ज्या वर्ग तीन वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांन मुळे उपजिल्हा रुग्णालय केज याला तीन तीन महाराष्ट्र राज्याचे पारितोषिक भेटले त्या कर्मचाऱ्यांवर माणसा ऐवढ्या वाढलेल्या गवतात राहावे लागत आहे. कुठलीही स्ट्रीट लाईटची व्यवस्था नसलेल्या साप,विंचू या सरपटणाऱ्या प्राण्या च्या भितीच्या सावटा खाली राहावे लागते.

व ड्युटीवर यावे जावे लागते,याच कुणालाच सोयरसुतक नाही.घरभाडे,लाईट बील महिन्याच्या, महिन्याला पगारातुन कट करणाऱ्या रुग्णालया कार्यालयाला ना सार्वजनिक बांधकाम विभागाला.किती वेळेस कार्यालयास कळवले तरी गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनास काही एक देणे घेणी नाही कारण त्यांना येऊन जाऊन करायचे आहे,येथे राहीचेच नाही तर दुःख काय कळणार.कमीत कमी आता तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी कर्मचारी वर्गातुन भावना व्यक्त होत आहे.