✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.३१ऑक्टोबर):-रोजी गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब यांची नागपूर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रीय निधी अंतर्गत मंजूर रस्त्यांच्या व मोठ्या फुलांच्या कामास निधी उपलब्ध करून लवकर टेंडर लावून रस्त्याच्या व मोठ्या फुलांच्या कामास सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली.
यामध्ये

१} गंगाखेड – परळी मंजूर रस्त्याच्या कामाची सुरुवात दत्त मंदिर गंगाखेड येथून सुरुवात करण्यात यावी.
२} गंगाखेड-पिंपळदरी मार्गे किनगाव मंजूर रस्त्याचे टेंडर तात्काळ लावण्यात यावे.
३} गंगाखेड-लोहा महामार्गाच्या कामास लवकर निधी उपलब्ध करून टेंडर लवकर लावण्यात यावे.
४} गंगाखेड मतदार संघातील मोठ्या मुलांचे कामे लवकर मंजूर करण्यात यावेत.

अशा प्रकारच्या मागण्या आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मंत्रीमहोदय यांच्याकडे केल्या सदर रस्त्याचे व मोठ्या पुलाचे काम लवकर सुरू झाल्यास मतदार संघातील शेती-उद्योग दळणवळना खाली येऊन मतदार संघाचा फायदा होईल.सदरच्या मागणीचे मंत्रीमहोदयांनी लवकरच मागण्या व निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासित केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED