आमचे प्रेरणास्थान असलेल्या व्यक्तीमत्त्वाला त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी मानाचा मुजरा!

29

प्रत्येक व्यक्ती आपल्या कपाळावरील नशिबरेषा (लक्ष्मणरेषा) बदलविण्यासाठी ईश्वराचा धावा करत असतो. यासाठी वाटेल ते करून ईश्वराचे दर्शन घडवू पाहत असतो. ते दर्शन घडविण्यासाठी कधी तो मंदिरात जात असतो, तर कधी दगडातच शोधत असतो. पण ईश्वराचे वास्तव्य या अवास्तव वस्तूत नसून आपल्याच ह्रदयात आहे, हे कधी तो आपल्या ह्रदयात डोकावून पाहतच नाही. याचे प्रत्यक्ष अनुभूती दर्शविणारे व प्रचंड जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास या गोष्टींच्या बळावर आपले वेगळे असे स्थान निर्माण करून स्वकर्तृत्वाने पुढे आलेले एक युवा व्यक्तीमत्त्व म्हणजे सुनील श्रीराम बोनगिरवार.

यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी या तालुक्याच्या परिक्षेत्रातील कमळवेल्ली या छोट्याशा गावात सामान्य कुटूंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी जेमतेम… लहानपणीच पितृछाया हरवलेली…तरी पण आईच्या कुशीत व मोठ्या भावाच्या ममतेत वाढून त्या ममतेची शिदोरी गाठीला घेऊन, अनेक संकटांना तोंड देत विश्वासाने आज यशाचं शिखर गाठलय. त्यांची जिद्द व कमालीच्या चिकाटीने सध्या ते अकोला स्थित डेअफ अँड डम्ब गर्ल स्कूल मध्ये विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे.

लहानपणापासूनच समाजसेवेचा वसा घेतले होते. पितृप्रेमाला मुकलेले असूनसुद्धा त्यांच्या ह्रदयातून दुस-यांप्रती प्रेमाचा पाझर सदा ओसंडून वाहत असत. अगदी प्राथमिक शिक्षणापासून गरजवंताना आर्थिक मदतीपासून तर इतर कोणत्याही मदतीसाठी तत्पर असत. गरीब कुटूंबातील वर्गमित्रांना परिधान करायला बरोबर कपडे नसताना गांधीजींच्या खादी सूत्राचा अंगिकार करून आपल्या परीने स्वत:चे कपडे व शालेयपयोगी साहित्य त्यांना मदत स्वरूपात द्यायचे. या मदतीतून त्यांना जो आनंद मिळत गेला, त्यामधून समाजसेवेच्या महाकाय वृक्षाची मुळे त्यांच्या मनात खोलवर रुजत गेली.

आज ते कुणाचंही कोणत्याही क्षेत्रातील कार्य असो ना, ते कार्य करण्यास धावून जाण्यास कचरत नाही. एवढच नव्हे तर विद्यार्थ्यांना शिक्षणग्रहन करण्यास कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये. म्हणून शिक्षणदान करणा-या परिसरातील सर्व शिक्षण संस्थांचे अडगळीत पडलेले प्रश्न ते आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने निकालात काढत असतात. कारण त्यांच्यात अशी संवाद यंत्रणा आहे की, कोणत्याही व्यक्तीला ते तोंडात बोटे टाकण्यास भाग पाडतात. आता आपले संपादक सर सुद्धा त्यांना भेटण्यास उत्सुक होतील असं मला तरी वाटते. सांगायचं तात्पर्य म्हणजे “तुमची साद आमच्या कानी व आम्ही तुमच्या अंगणी” या सेवामूल्यांचा अवलंब करणा-या या महान व्यक्तीमत्त्वाबद्दल आणखी काय सांगायचं? सांगायचं तर खूप काही आहे, पण शब्द अपुरे पडतात.

आयुष्याचं सार्थक करण्यासाठी माणसाच्या अंगात एकतरी कलागुण असणे आवश्यक आहे. या कलागुणामुळेच माणसाचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व समाजापुढे उभं राहतं. हे या युवा व्यक्तिमत्त्वानं आज आपल्याला दाखवून दिलं. परिस्थिती माणसाला घडवत असली, तरी आत्मविश्वास, प्रेम व आपलं अथक परिश्रम या त्रिसूत्रीने परिस्थितीवरही आपण मात करू शकतो. असं त्यांच्या वाटचालीतून आपल्याला दिसून येतं.असे आमचे प्रेरणास्थान व आमच्या जीवनाचे शिल्पकार असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे या व इतर अनेक सामाजिक कार्यात भविष्यातही त्यांचे असेच योगदान राहील असा विश्वास बाळगून त्यांना दिपावलीच्या शुभेच्छासह त्यांच्या वाढदिवसाच्या व भविष्याच्या वाटचालीकरीता मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

✒️सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-7057185479